Sarva Pitru Amavasya 2024 : हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, पितृ पक्षात (Pitru Paksha 2024) पितरांचं स्मरण केलं जातं. आणि त्यांच्यासाठी तर्पण-श्राद्ध केलं जातं. ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जे लोक पितृ पक्षाच्या 15 दिवसांत श्राद्ध-तर्पण करु शकले नाहीत त्यांनी पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करुन त्यांच्या नावाने दान किंवा पुण्य कर्म करावे. 


पितृ पक्ष अमावस्येला सर्वाधिक महत्त्व  


कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस हा अमावस्येचा दिवस असतो. आणि अमावस्या तिथीला पितरांचं अधिपत्य आहे. अशातच पितृ पक्षाच्या अमासवस्येचं महत्त्व फार वाढलं आहे. कारण या दिवशी सर्व ज्ञात-अज्ञात पितरांचं तर्मण आणि श्राद्ध केलं जातं. पितृ पक्ष अमावस्येला सर्व पितृ अमावस्या किंवा मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. 


पितरांच्या शांतीसाठी करा 'हे' काम 


पूर्वजांना किंवा पितरांचा आशीर्वाद मिळावा तसेच त्यांना खुश करणं देखील फार गरजेचं आहे. याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे पितृपक्षाच्या दिवशी पितरांचं श्राद्ध करणं. अर्थात, मृत माता-पित्यांचं श्राद्ध हे तिथीनुसारच केलं जातं. मात्र, जर तुम्हाला त्यांची मृत्यू तिथी माहीत नसेल तर त्यांचं तर्पण, श्राद्ध तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील करु शकता. 


मांसाहारी पदार्थ आणि तामसिक पदार्थांपासून दूर राहा 


सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केलें दान आणि श्राद्ध हे केवळ पूर्वजांनाच नाही तर श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला देखील शांती देणारं आहे. या दिवशी भोजनात चुकूनही लसूण-कांद्याचा वापर करु नये. तसेच, मांसाहारी पदार्थांचा वापर देखील करु नये. 


गरजूंची मदत करा 


पितृपक्षाच्या दरम्यान आणि विशेषत: अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्ती जर तुमच्या जवळ येत असतील तर तुमच्या क्षमतेनुसार त्यांना नक्की मदत करावी. ती व्यक्ती तुमच्यामुळे नाराज होणार नाही याचा प्रयत्न करा. 


'या' गोष्टींचं दान करणं असतं शुभ 


या दिवशी पितरांना अर्घ्य आणि त्यांच्या नावाने दान केल्याने पितृ तर्पणचं फळ प्राप्रत होतं. तसेच, ब्राह्मणांना भोजनासह त्यांना तुमच्या क्षमतेनुसार  अन्न, वस्त्र, भांडी, तीळ, चांदीचं भांडं किंवा एखादी वस्तू नक्की दान करावी. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावस्येला चुकूनही 'या' चुका करु नका; वर्षभरातच व्हाल कंगाल