Sarva Pitru Amavasya 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृ पक्षाचं शेवटचं श्राद्ध-तर्पण केलं जातं. हा दिवस पितृपक्षाचा (Pitru Paksha 2024) शेवटचा दिवस मानला जातो. 15 दिवसांच्या श्राद्ध पक्षात ज्या पूर्वजांच्या निधनाची तिथी लक्षात नसते त्यांच्यासाठी आणि अज्ञात पूर्वजांसाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केलं जातं. यासाठीच या दिवसाला सर्व पितृ अमावस्या म्हणतात.
तसं पाहिल्या, सर्वच अमावस्या तिथी पितरांना समर्पित आहे. मात्र, पितृ पक्ष अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यासाठीच या दिवशी काही विशेष नियम असतात. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, पितृ अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
पितृ अमावस्येच्या दिवशी या गोष्टींची काळजी घ्या
यावर्षी पितृ पक्ष अमावस्या 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आहे. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध-तर्पण केलं जातं. तसेच, इतर अमावस्येच्या दिवशी सुद्धा स्ना-दान केलं जातं. मात्र, सर्व पितृ अमावस्येला काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
- सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी. त्यानंतर पूजा-पाठ आणि दान करावे.
- सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करु नये. तसेच, तामसिक पदार्थ घरी घेऊन आणू नयेत. या दिवशी लसूण-कांदा देखील खाऊ नये.
- सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नखं-केस चुकूनही कापू नयेत. यामुळे पितृ नाराज होतात.
- सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करु नये. तसेच, भांजडण-वाद घालू नयेत. कोणाचं मनही दुखवू नये.
- याच काळात वृद्ध व्यक्तींचा देखील आदर करणं, त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. तसेच, कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास देऊ नये.
- सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार दान करावं.
या गोष्टी जर सर्व पितृ अमावस्येला केल्या नाहीत तर नक्कीच पितरांचा तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :