Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचांगानुसार, आज माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी आहे. आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास भगवान गणपतीला (Lord Ganesh) समर्पित केला जातो. या दिवशी त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीवर श्रीगणेश कृपा करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे संपतात. याशिवाय स्त्रिया सुख, शांती, समृद्धी आणि संतानप्राप्तीच्या इच्छेने हा उपवास करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सविस्तर जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत.



गणेशाची कृपा होईल, जीवनातील अडचणी संपतील!
पंचागानुसार, दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपतीची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी आणि वाईट प्रसंग लवकर टळतात. सुख, सौभाग्य, संतती समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी महिला हे व्रत ठेवतात. असे सांगितले जाते की, संकष्टी चतुर्थीला गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने कुंडलीतील बुध, राहू आणि केतूमुळे होणारे दोष दूर होतात. जाणून घ्या. संकष्टी चतुर्थीनिमित्त पूजेची वेळ आणि उपासना पद्धती, तसेच ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय.



संकष्टी चतुर्थी 2023 शुभ मुहूर्त
आजची संकष्टी चतुर्थी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:10 वाजता सुरू होईल आणि 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.58 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 9 फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी संध्याकाळी 4 वाजून 44 मिनिटांनी सुकर्म योग तयार होत असून या योगात केलेल्या कार्यात व्यक्तीला निश्चितच यश मिळते. या व्रतामध्ये चंद्राला विशेष महत्त्व आहे, कारण चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच व्रत केले जाते. आज चंद्रोदयाची वेळ रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी आहे.



संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील देवघराची स्वच्छता करून श्रीगणेशाची पूजा करावी. या दिवशी श्रीगणेशाला उत्तर दिशेला तोंड करून पाणी अर्पण करावे आणि पाण्यात थोडे तीळ मिसळावे. यानंतर गणेशाला दुर्वा अर्पण करून लाडू अर्पण करा. दिवसभर फळे खावीत आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडावा.


 


राहू-केतू आणि बुध दोषांवर उपाय


-भगवान गणेशाला बुध ग्रहाची देवता मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 21 लाडू अर्पण करा आणि ओम ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: असा जप करा. असे मानले जाते, यामुळे बुधाच्या दोषांपासून आराम मिळतो.


-बुध ग्रहाच्या शांतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या पूजेनंतर हिरवी वेलची, हिरवे कपडे, मूग डाळ यांसारख्या वस्तू तृतीयपंथीयांना दान करा.


-संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने राहू-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो. आजची संकष्टी चतुर्थी गुरुवारी आहे. कुंडलीत केतूला बलवान बनवण्यासाठी आज निळ्या धाग्याने अश्वगंधाचे मूळ निळ्या कपड्यात बांधल्यास फायदा होतो.


-विघ्ननाशक श्रीगणेश हे व्यक्तीच्या पत्रिकेतील राहू आणि केतू यांच्या शांतीसाठी सर्वात मोठा आधार मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला शेंदूर अर्पण करा. राहु यामुळे कधीही त्रास देत नाही, असे मानले जाते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Swapna Shashtra : स्वप्नात गणपती बाप्पा दिसले तर समजून जा की...! जाणून घ्या स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?