Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. नुकताच देशभरात हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) उत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनंतर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे (Ganesh Chaturthi) विशेष महत्त्व आहे. हे व्रत स्त्री-पुरुषांसाठी शुभ मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची (Lord Ganesha) पूजा केली जाते. नैवेद्य तयार केला जातो. देवासाठी उपवास केले जातात. 


संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त Sankashti (Chaturthi 2024 Shubh Muhurta) :


चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 27 एप्रिल रोजी सकाळी 8:17 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी सकाळी 8:20 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रदर्शनाची वेळ रात्री 10.30 वाजता असेल. 28 एप्रिल रोजी सकाळी 7:38 वाजता चंद्रास्त होईल.


आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी


जर तुमच्या हातात पैसा नसेल आणि महिना संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात गुळ आणि तुपाचा समावेश करा. असे केल्याने तुम्हाला धन लाभ होईल आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल.


नोकरीत बढतीसाठी 


संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला हळदीच्या 5 पिंपळ्या अर्पण करा आणि 'श्री गणाधिपतये नमः' या मंत्राचा जप करा. हा उपाय 10 दिवस सतत करा. असे मानले जाते की, असे केल्याने साधकाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होते.


व्यवसायात यश मिळवण्याचे मार्ग


खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजेदरम्यान गुळाचे लाडू अर्पण करावेत. असे केल्याने व्यवसायात निश्चितच यश मिळते.


मानसिक तणाव दूर करण्यासाठी 


तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला सुपारी अर्पण करा. तसेच गाईला हिरवा चारा द्यावा. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख-शांती राहते आणि सकारात्मक उर्जा वास करते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Chanakya Niti : आयुष्यात कधीच पडणार नाही मागे; उंच भरारी घेण्यासाठी पक्ष्यांकडून शिका 'या' 4 गोष्टी, चाणक्य सांगतात...