Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात, एक असते कृष्ण पक्षात आणि दुसरी असते शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024) म्हणतात, तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. चतुर्थी तिथी ही भगवान श्रीगणेशांना समर्पित आहे आणि या दिवशी विघ्नहर्ता श्रीगणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार, जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत करते, त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात. बाप्पा चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करता, म्हणूनच संकष्टी चतुर्थी व्रताचं हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. 


संकष्टी चतुर्थी व्रताचं पालन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. कोणत्या पदार्थांचं सेवन करावं आणि कोणत्या नाही हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.


सैंधव मीठ वापरा, काळं मीठ नको


जर तुम्ही चतुर्थी धरली असेल, चतुर्थीचा व्रत करत असाल तर तुम्ही फलाहार करावा. फळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही या दिवशी मिठाचा वापर करणार असाल तर सैंधव मिठाचा वापर करावा, हे उपावासाचं मीठ असतं. तुम्ही साध्या मिठाचा वापर पण करू शकता, मात्र काळ्या मिठाचा वापर अजिबात करू नका.


खिचडी, रसदार फळं खा


या उपवासाला तुम्ही शाबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो, दही वैगेरे खाऊ शकता. व्रताच्या वेळी आपल्या शरिरातील पाणी कमी होतं, ते पाणी भरुन काढण्यासाठी रसदार फळांचा वापर करा. 


संकष्टी चतुर्थीला हे पदार्थ खाऊ नये



  • संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमीनीखाली उगवलेले पदार्थ खाऊ नये. ते खाऊ नका. गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे.

  • चतुर्थीला फणस देखील खाऊ नये.

  • पापड, वेफर्समध्ये जर मसाल्यांचा वापर असेल, तर ते देखील खाऊ नये.

  • उपवासाच्या दिवशी तुळशीचा वापर कुठेही करू नये. तुळशीच्या मंजुळांचा वापर देखील करू नये.

  • संकष्टी चतुर्थीला तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य तामसिक भोज, मांसाहार करणार नाही याची काळजी घ्या. या दिवशी मद्यपान देखील करू नये.

  • चतुर्थीच्या दिवशी उष्ट अन्न खाऊ नये.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय