Sankasht Chaturthi 2024 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, आज 2024 वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीचा (Sankasht Chaturthi) दिवस हा गणपतीला समर्पित आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान गणेशाची (Lord Ganesha) पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. तसेच, जीवनात सुख समृद्धी येते.
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी 10 वाजून 06 मिनिटांनी होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 19 डिसेंबर रोजी 10 वाजून 02 मिनिटांनी होईल. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करु नये?
- आजच्या दिवशी घरात मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. यामुळे भक्ताला इच्छित फळ प्राप्त होत नाही.
- गणपतीची पूजा करताना तुळशीची पानं वाहू नका.
- संकष्ट चतुर्थीच्या काळात काळ्या रंगाचे वस्त्र धारण करु नये. तर, या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाच्या वस्त्राने गणपतीची पूजा करावी.
- आजच्या दिवशी उपवास ठेवला नसेल तर सात्विक आहाराचं सेवन करावं.
- पूजेच्या ठिकाणी गणपतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा.
'अशी' करा पूजा
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तात भगवान गणेशाची पूजा करणं शुभ मानलं जातं. या दिवशी गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. या व्यतिरिक्त ज्या भक्तांनी उपवास केला आहे त्यांनी उपवास करण्याआधी संकल्प नक्की करावा. आणि सूर्यास्तानंतर पारण करा. तसेच, तुम्ही भजन- कीर्तन करु शकता. यामुळे भगवान गणेश तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )