Nose Shape Personality : समुद्र शास्त्रात शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार, प्रकार, रंग, पोत याच्या आधारे माणसाचं व्यक्तिमत्त्व (Personality) सांगण्यात आलं आहे. एखाद्या अवयवावरुन व्यक्तीचं आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती इ. स्पष्ट करण्यात आली आहे. नाक (Nose) देखील यापैकी एक आहे. वास्तविक नाक आदराचं प्रतिक मानलं जातं. कधी कधी लहान मुलांच्या परीक्षा, मोठ्या क्रीडा स्पर्धा किंवा अशा कोणत्याही स्पर्धेला ते गेले की त्यांना सांगितलं जातं की, नाक खाली करुन येऊ नका. म्हणजेच स्पर्धेत हरुन येऊ नका.


आपलं नाक नेहमी उंच ठेवलं पाहिजे, म्हणजेच आपल्याला सगळ्यातून विजयी होऊन बाहेर पडलं पाहिजे. आता याच नाकाचा आकार एखाद्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


नाकाच्या आकारावरुन समजून घ्या माणसाचं व्यक्तिमत्त्व



  • काही लोकांच्या नाकाच्या टोकावर काही प्रकारचं जन्मजात चिन्ह असतं. जसं की तीळ किंवा एखादी खूण. ही जन्मखूण त्यांच्या नाकाचे दोन भाग करते. ज्या पुरुषांच्या नाकाच्या बरोबर मधोमध जन्मखूण असते, त्यांना सामान्यतः आर्थिक अडचणीतून जावं लागतं, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा लोकांकडे कधीही पुरेसे पैसे नसतात. त्यांची सर्व कामं सहजपणे पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. नाकाच्या मध्यभागी जन्मखूण असणारे लोक नेहमी पैशाअभावी जीवन जगतात.

  • त्याच वेळी, उंच नाक असलेल्या लोकांचं उत्पन्न जास्त असतं. त्यांचं उत्पन्न इतकं जास्त असतं की ते दैनंदिन किंवा मासिक गरजांसाठी आवश्यक पैसे खर्च केल्यानंतर देखील पैशांची बचत करतात.

  • ज्या लोकांचं नाक चोचीसारखं उंचावलेलं असतं, ज्याला गरुडकार असंही म्हणतात. तर अशा व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांना समाजात खूप आदरही मिळतो.

  • त्याचप्रमाणे ज्या लोकांचे नाक काहीसे सपाट असते ते अतिशय साधे स्वभावाचे मानले जातात, त्यांच्या साधेपणाचा कोणी गैरफायदा घेतला तरी ते आपला साधेपणा कधीच सोडत नाहीत.

  • काही लोकांचे नाक एका बाजूला थोडेसे झुकलेले असते. ज्या लोकांचे नाक उजवीकडे झुकलेले असते ते शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत असतात, अशा लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे.

  • मोठी नाकपुडी असलेली व्यक्ती नेहमी निरोगी राहते. त्याला त्याच्या आयुष्यात चांगले आरोग्य लाभते. त्यांच्याकडे पैसा देखील जास्त टिकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : 2024 मध्ये शनिची स्थिती 3 वेळा बदलणार; मेषसह 'या' राशींच्या लोकांचं उजळणार नशीब