Shani 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलतात. इतकंच नाही तर ज्योतिषीय गणनेनुसार, जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत मार्गक्रमण करतो किंवा वक्री होतो, तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण जगासह सर्व 12 राशींवर दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि (Shani) हा न्याय देणारा, कर्माचे फळ देणारा मानला जातो. शनिदेव सर्व राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनि 2025 पर्यंत कुंभ राशीत राहणार असला तरी, 2024 मध्ये त्याच्या स्थितीत मोठा बदल होईल.
2024 मध्ये 3 वेळा बदलणार शनिची स्थिती
शनिदेवाचा 11 फेब्रुवारी 2024 ते 17 मार्च 2024 या कालावधीत अस्त होईल, तर 18 मार्च रोजी शनिदेव पुन्हा उगवतील. याशिवाय 29 जून ते 15 नोव्हेंबर या कालावधीत शनि वक्री होईल. अशावेळी शनीच्या अशा स्थितीबदलाचा परिणाम सर्व 12 राशीच्या जातकांवर होणार आहे. परंतु शनिच्या प्रभावामुळे 2024 हे वर्ष 3 राशींसाठी भाग्यशाली असेल, या राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
नववर्षात मेष राशीच्या व्यक्तींचा व्यवसाय वाढेल. मेष राशीच्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील, शनिदेवाची स्थिती बदलल्याने मेष राशीच्या लोकांना दिवसरात्र चौपट नफा होईल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल, जोडीदाराची चांगली साथ मिळेल. अध्यात्मात रुची वाढेल. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल, तर विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. जीवनात काही समस्या असणं सामान्य आहे. त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना 2024 मध्ये नोकरीत चांगल्या संधी मिळतील. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल, नववर्षात तुम्हाला कुटुंबासाठी वेळ काढण्यात अडचण येणार नाही. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळवण्याच्या संधी मिळतील. करिअरमध्ये येणाऱ्या अनेक समस्या संपुष्टात येऊ शकतात.
मिथुन रास (Gemini)
नववर्षात मिथुन राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल, तुमचा मान-सन्मान वाढेल. 2024 मध्ये तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची नवी संधी मिळेल. शुभ कार्यात पैसा खर्च करावा लागू शकतो, तुमच्या कुटुंबातील आरोग्याची स्थिती चांगली राहील. येत्या वर्षात तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो, तुम्हाला चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :