Sagittarius Weekly Horoscope 8th To 14th April 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा धनु राशीसाठी संमिश्र परिणाम देणारा ठरेल. तुम्हाला सुरुवातीला त्रास जाणवेल, परंतु नंतर तुमचं जीवन सुकर होईल. एकूणच धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Life Horoscope)
जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहत असाल, म्हणजेच जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला अचानक भेटायला येऊन सरप्राईझ देऊ शकतो. तु्म्हाला तुमचा प्रियकर खुश आहे ना, याची खात्री करावी लागेल. काहींचं नशीब इतकं चांगलं असेल की त्यांचा जुना प्रियकर त्यांच्या आयुष्यात पुन्हा येईल. विवाहितांनी बाहेर लफडी करू नये, अन्यथा वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
नवीन नोकरीसाठी मुलाखत देणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कामावर नीट राहा आणि वरिष्ठांशी वाद टाळा. तुमच्या कल्पना मॅनेजमेंटकडून स्वीकारल्या जातील, ज्यामुळे तुमचं प्रोफाईल चांगलं होईल. आठवड्याचै सुरुवातीचे दिवस व्यवसायासाठी चांगले नाही, आठवड्याच्या मध्यात व्यावसायिकांना नशिबाची साथ लाभेल. आरोग्य सेवा, वाहतुकीशी संबंधित व्यावसायिकांना चांगला परतावा मिळेल.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
आठवड्याची सुरुवात पैशाच्या दृष्टीने लाभदायक ठरणार नाही. कुटुंबात मालमत्तेशी संबंधित समस्या असू शकतात. मित्र किंवा भावंडांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहाराचं निराकरण करा. काही धनु राशीच्या स्त्रिया काही मालमत्ता खरेदी करतील. लेदर, फर्निचर, फार्मास्युटिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला परतावा मिळेल. तुम्ही शेअर बाजार किंवा रियाल्टीतही गुंतवणूक करू शकता.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
तुम्ही आज एखाद्या आजारातून बरे होऊ शकता. तर ज्येष्ठांना श्वासोच्छवास किंवा छातीशी संबंधित समस्या असतील तर काळजी घ्या. ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन ठेवा. व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा. वाहन चालवताना वाहतुकीचे सर्व नियम पाळा. गरोदर धनु राशीच्या महिलांनी सुटीच्या काळात साहसी उपक्रम टाळावेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :