Sagittarius Horoscope Today 3rd April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीमध्ये (Job) प्रगती झाल्यानंतर तुम्ही खूप आनंदी व्हाल. कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतील, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही जवळपास होणाऱ्या कार्यक्रमातही सहभागी व्हा ज्यामुळे तुमची इतरांशी ओळख होईल. आज बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर (Life Partner) काही कारणास्तव वाद होईल. पण, तुम्ही अनावश्यक वाद वाढवू नका. 


मानसिक तणावापासून दूर राहा 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुमचे काम लांबणीवर पडेल. आज तुमचे खर्च तर होतीलच, पण तुमच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल. आज मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील, परंतु वैयक्तिक जीवनात तणाव सुरू होऊ शकतो.


आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु पैशाच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.


आजचे धनु राशीचे आरोग्य


आज तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, दातदुखी इ. उपचारास उशीर करणे योग्य होणार नाही. याशिवाय आज खाण्यापिण्याची काळजी घ्या.


धनु राशीसाठी आजचे उपाय


उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 3rd April 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य