Horoscope Today 3rd April 2023 : आज आठवड्यातला पहिला दिवस सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. तर, काही राशींनी काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.


मेष 


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा योग जवळ आला आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल.  आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीच्या संधी मिळू शकतात, त्यांच्या पदातही वाढ होईल. त्यांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आरोग्याच्या बाबतीत आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपवता येतील, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. घरात मांगलिक कार्यक्रम पार पडणार यावेळी सगळे खुश दिसतील.  


वृषभ 


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन काम सुरू करण्याचा चांगला योग आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करा, यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बसून एखाद्या विषयावर चर्चा करा. यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यात सभ्यता राखावी लागेल. आज उत्पन्नात घट आणि खर्चाचा अतिरेक होईल, पण आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्हाला छोट्या नोकऱ्या मिळतील, ज्यातून तुम्हाला नफा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात, ज्यामध्ये तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करतील.


मिथुन


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता जाणवेल. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्ही लवकर बरे व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आज दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. जे वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते व्यवसायात काही बदल करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांशी चर्चा करा. आज तुम्हाला तुमचा एखादा मित्र पण भेटू शकतो. त्याला पाहून तुम्ही खूप खुश व्हाल. 


कर्क


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. जे व्यवसाय करतायत त्यांना अनपेक्षित नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढउतार दिसून येऊ शकतो.नोकरीमध्ये तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. व्यवसायात काही अडचणी येतील, ज्याचा तुम्ही खंबीरपणे सामना कराल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.      


सिंह 


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. व्यवसायात यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. तुम्ही भागीदारीत असलेल्या व्यवसायात  तुम्हाला यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचाही बेत केला जाईल. कुटुंबातील सदस्यांशी बोलतांना आपल्या बोलण्यात नम्रता ठेवा, अन्यथा मतभेद होऊ शकतात. विश्वास बाळगा. नोकरदार लोक नवीन नोकरीची ऑफर स्वीकारतील, ज्यामध्ये त्यांचे उत्पन्न अधिक असेल आणि पदातही वाढ होईल. उद्या तुम्हाला सामाजिक कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मिळेल, जिथे तुम्ही तुमच्या बोलण्याच्या सौम्यतेमुळे सर्वांची मने जिंकू शकता. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यातील चढ-उतारांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल. योगा, ध्यान आणि मॉर्निंग वॉक यांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास चांगले होईल. 


कन्या 


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शिक्षणात तुमच्या यशाचे कौतुक होईल. ज्येष्ठांना उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याची काळजी घ्या. मॉर्निंग वॉक, योगासने आणि ध्यानाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश केल्यास अधिक चांगले फायदे मिळतील. सत्ताधारी प्रशासनाकडून तुम्हाला मदत केली जाईल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधीही मिळेल. आज तुम्ही मित्रांसोबत तुमची आवडती कामे करू शकता. 


तूळ 


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या व्यवसायात मोठा फायदा होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. थांबलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कष्टकरी लोकांना अधिक मेहनत करावी लागेल. आज तुमचा खर्च जास्त असेल. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. 


वृश्चिक 


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कठोर परिश्रम देखील करावे लागतील, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. व्यवसायात नवीन करारामुळे फायदा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज आपले विचार कोणाशीही शेअर करू नका. तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी चांगली संधी आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करा. सामाजिक कार्यकर्त्यांना तुमच्या सन्मानात वाढ होईल. जे तरुण नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे भटकत आहेत, त्यांना अजून थोडी वाट पाहावी लागेल. मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला फायदा होईल. लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. ज्येष्ठ सदस्य तुमच्यावर अधिक कौटुंबिक जबाबदाऱ्या आणू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे नाराज व्हाल पण ही जबाबदारी देखील तुम्ही पार पाडाल. शकता.


धनु 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीमध्ये प्रगती झाल्यानंतर तुम्ही खूप आनंदी व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतील, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही जवळपास होणाऱ्या कार्यक्रमातही सहभागी व्हा ज्यामुळे तुमची इतरांशी ओळख होईल. आज बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर काही कारणास्तव वाद होईल. पण, तुम्ही अनावश्यक वाद वाढवू नका. 


मकर


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमची रखडलेली कामे पूर्ण करा. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. राजकारणात तुमचं यश दिसेल. तुम्ही कठीण परिस्थितीतही गोंधळून जाणार नाही. नोकरीत अधिकार्‍यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना उद्या चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही जो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करा. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.  


कुंभ 


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज व्यवसायात अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळू शकतो. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकता. चांगल्या मित्राच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि तुमच्या आवडीचे काम करा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. आवश्यक कामे वेळेवर पूर्ण करा. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना समाजासाठी चांगले काम करण्याची अधिक संधी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. 


मीन 


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. सुखद प्रवासाचे योगायोग आहेत. व्यवसायासाठी परदेशात जाऊ शकता. संशोधन कार्यात चांगले यश मिळेल. व्यवसायातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह काही महत्त्वाचे काम पूर्ण करा. तुम्ही मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करा आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज पैसे येण्याचे लक्षण आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)