Sagittarius Horoscope Today 13th March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करु शकता. खर्च आणि गुंतवणूक वाढत राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. लोकांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. 


कामात यश मिळेल 


धनु राशीचे लोक आज कुटुंबीयांसह तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकतात. यासोबतच तुम्ही पैसेही वाचवू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदाचे असेल. आज तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील. सत्ताधाऱ्यांशी तुमची जवळीकही वाढेल. आत्मविश्वासाने केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. 


नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहिल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. आज तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. तुमच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होईल.


आजचे धनु राशीचे आरोग्य


आज धनु राशीचे आरोग्य चांगले राहील. रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमित कालावधीने स्वतःची तपासणी करुन घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा.


धनु राशीसाठी आजचे उपाय


घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 13th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य