Sagittarius Horoscope Today 13 April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील, प्रत्येकजण आपले सुख-दु:ख वाटून घेतील. तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. घरातील वरिष्ठ सदस्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल. जे अविवाहित (Unmarried) लोक आहेत त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. संध्याकाळचा वेळ तुमच्या जोडीदारासोबत (Life Partner) एखाद्या ठिकाणी घालवल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न होईल. जवळच्या मित्राच्या मदतीने उद्या काही व्यावसायिकांना खूप पैसे मिळण्याची शक्यता आहे, यामुळे तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात. गरजेच्या वेळी मित्रांची साथ मिळेल. 


आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने यशस्वी ठरेल. आज विद्यार्थी वर्गातील लोकांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. आज कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम घेऊ नका. जर तुम्ही आज गुंतवणुकीची योजना आखत असाल तर सध्यातरी गुंतवणूक टाळा. आज तुमची जवळची व्यक्ती तुमची मदत मागू शकते. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील.


आजचे धनु राशीचे कौटुंबिक जीवन


कुटुंबात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद आणि दबाव निर्माण होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्यावर नाराज होऊ शकतात. अशा वेळी संयम ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा.  


धनु राशीसाठी आजचे तुमचे आरोग्य 


आज जास्त थकव्यामुळे तुम्हाला पाठदुखी होऊ शकते आणि तुमचे काही काम अडकू शकते. पाठीचा कणा सरळ ठेवून काम करण्याची सवय लावा.


धनु राशीसाठी आजचे उपाय 


कपाळावर पिवळा टिळा लावून तुळशीच्या झाडाची पूजा करा. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये बेसनाचे लाडू अर्पण करावेत.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 13 April 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना 'या' समस्यांना सामोरं जाण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य