Sagittarius Horoscope Today 08th March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामात तुमची एकाग्रता दिसणार नाही. नोकरीच्या ठिकाणीही वरिष्ठांचा दबाव तुम्हाला त्रास देईल.


आर्थिक बाजू मजबूत होण्याची सर्व शक्यता आहे, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते परत मिळण्याची शक्यता आहे. लहान मुलांबरोबर आजचा तुमचा वेळ चांगला जाईल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.आज तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. तसेच तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, ज्याला भेटून तुम्ही तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्याल.


वरिष्ठ सदस्यांकडून धनलाभाचे संकेत


जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्हाला चिंता वाटेल. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करू लागतील. प्रत्येकजण पुढे जाऊन काम करताना दिसेल. जे लोक घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना आज चांगला फायदा होईल. वरिष्ठ सदस्यांकडून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आईचा सहवास मिळेल. वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.


धनु राशीसाठी आजचे आरोग्य :


आज धनु राशीचे आरोग्य पाहता चांगले राहील. पण, मानसिक तणावही तितकाच जाणवेल.  


धनु राशीसाठी आजचे उपाय :


कपाळावर पिवळा टिळा लावा, हळदीच्या दुधाचे सेवन करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 08th March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या