Sagittarius Horoscope Today  06 February 2023: आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी चांगला असून तुम्हाला लाभ मिळू शकतो. आज मित्र-मंडळीसोबत उत्तम वेळ जाईल. ऑफिसमध्येही अचानक झालेला नवीन बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. कर्क राशीनंतर चंद्राचा संचार सिंह राशीत असेल. यासोबतच आठवड्याच्या पहिल्या दिवशी सौभाग्य योगही तयार होत असून आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव राहील. ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या कामात लक्ष द्यावे. कुटुंबात पूजाविधीचा कार्यक्रम होऊ शकतो. धनु राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? धनु राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या



धनु राशीचा आजचा दिवस कसा जाईल?


ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीचा आजचा दिवस पाहता या राशीच्या नोकरी, व्यवसायात असणाऱ्या व्यापारी लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त राहील. कामाच्या वेळी व्यवसायात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. सरकारी नियमांचे उल्लंघन किंवा करसंबंधित चुकांमुळे कामात अडथळा येऊ शकतो. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी प्रलोभन किंवा लाचखोरीपासून दूर राहावे, अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात. आज या राशीच्या नोकरदारांना ऑफिसमध्ये जास्त काम असेल, यासोबतच अधिकाऱ्यांची साथही मिळेल.



धनु राशीचे कौटुंबिक जीवन 
आज धनु राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास दिवस चांगला जाईल. कुटुंबात पूजाविधीचा कार्यक्रम होऊ शकतो. विवाहयोग्य तरुण आणि तरुणी यांच्यातील नाते पुढे जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी थोडा वेळ काढणे चांगले. संध्याकाळपर्यंतचा वेळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत जाईल.



धनु राशीचे आरोग्य 
धनु राशीचे आरोग्य पाहता या लोकांना मुळव्याध इत्यादी समस्या असू शकतात. रात्रीच्या जेवणानंतर फिरण्याची सवय लावणे फायदेशीर ठरेल. तसेच हलका आहार घ्या.



आज नशीब 71% तुमच्या बाजूने
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामाजिक कार्यात व्यस्त राहील. कौटुंबिक जीवनात काही तणाव राहील. कोणत्याही विषयावर चर्चा होऊन मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि नातेसंबंध तुटू शकतात. विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घ्या आणि आरोग्याबाबत जागरूक राहा. भौतिक सुखसोयींमध्ये घट होण्याची शक्यता आहे. आज अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातल्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. संध्याकाळी मंदिरात गेल्याने तुम्हाला आराम वाटेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. भुकेल्या लोकांना आणि मुक्या प्राण्यांनाही अन्न द्या.



धनु राशीसाठी आजचे उपाय 
व्यावसायिक प्रगतीसाठी सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडे भरून ओम नमः शिवाय असे म्हणत कामाच्या तसेच व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा.


शुभ रंग - पिवळा
शुभ क्रमांक - 4


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Scorpio Today Horoscope 6 February 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना नशीब साथ देईल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, राशीभविष्य