Ravi Pradosh Vrat 2024 : भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक उपवास केले जातात. तसेच, भगवान शंकराचा (Lord Shiva) वार सोमवार असल्या कारणाने या दिवशी त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीचं देखील वेगळं असं आध्यात्मिक महत्त्व आहे. या दिवशी भक्त प्रदोष व्रत ठेवतात आणि भगवान शंकराची विधीवत पूजा करतात.
त्यानुसार, भाद्रपद महिन्यातील त्रयोदशी तिथी 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आहे. यालाच रवि प्रदोष व्रत म्हणण्यात आलं आहे. पितृपक्षाच्या काळात प्रदोष व्रत आल्यामुळे या दिवशी काही साधे आणि सोपे उपाय करुन तुम्ही भगवान शंकरासह पितरांचा देखील आशीर्वाद मिळवू शकता. हे उपाय कोणते ते जाणून घेऊयात.
कपाळावर टिळा लावा
प्रदोष व्रताला वेगवेगळ्या नावाने संबोधण्यात येते. सध्या प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि पांढऱ्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर महादेवाची पूजा करावी. शिवलिंगावर जल, तीळ आणि शमीची पाने वाहा. त्याचबरोबर, शिव चालीसाचे पठण करा आणि पूजा झाल्यानंतर कपाळावर टिळा नक्की लावावा.
'या' मुहूर्तावर करा पूजा
या व्रताच्या दिवशी पूजा करण्यासाठी सर्वात शुभ वेळ ही प्रदोष व्रताची मानण्यात आली आहे. त्यामुळे या मुहूर्तात पूजा करा. या दरम्यान तुम्ही शिवलिंगावर केसर आणि साखर नक्की अर्पण करा. असं म्हणतात की, तुम्हाला जर पैशांशी संबंधित समस्या असतील तर हे उपाय करुन दूर होऊ शकतात. तसेच, भगवान शंकरही तुमच्यावर प्रसन्न होतील.
'या' गोष्टींचं दान करा
रवि प्रदोष वर्त ठेवणाऱ्या लोकांनी या दिवशी पांढरे वस्त्र, दूध, दही आणि तांदूळ तसेच,पांढऱ्या वस्तूंचं दान करावं. याशिवाय तुम्ही या काळात गरिबांना आणि गरजूंना कपडे, अन्न, आणि फळांचं देखील दान करु शकता. यामुळे भगवान शंकरच नाही तर पितर देखील तुमच्यावर खुश होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: