Rang Panchami Wishes in Marathi : होळीच्या पाचव्या दिवशी तिथीनुसार रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी देव पृथ्वीतलावर रंग गुलालाची उधळण करतात, अशी मान्यता आहे. हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण या सणाचा मुख्य उद्देश नात्यांमध्ये आनंद, उत्साह आणि एकता निर्माण करणं हा आहे. रंगपंचमीनिमित्त (Rang Panchami 2024) तुमच्या प्रियजनांना खास मराठीतीतून शुभेच्छा (Wishes) देत रंगाचा आनंद घ्या.


रंगपंचमी शुभेच्छा संदेश (Rang Panchami Wishes In Marathi)


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
रंगपंचमीच्या तुम्हाला
आणि तुमच्या परिवाराला रंगमयी शुभेच्छा!


रंग साठले मनी अंतरी 
उधळू त्यांना नभी चला 
आला आला रंगोत्सव हा आला…
तुम्हाला रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!


प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले, एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया रंगपंचमीच्या नशेत विलक्षण
रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!


नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!


धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ,
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू,
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
रंगपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग
हा सण तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो,
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!  


एका बाजूला कृष्ण सावळा,
दुसऱ्या बाजूला राधिका गोरी,
जणू काही एकमेकांत सामावलेले तो चंद्र आणि ही चकोरी,
रंगपंचमीच्या तुम्हाला रंगीत शुभेच्छा! 


क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण
तुम्हाला रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!  


हेही वाचा:


Weekly Horoscope 1 to 7 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा खास; जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक