Rang Panchami 2025 Wishes In Marathi: हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या होळीच्या अवघ्या पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये रंगपंचमीचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाशी संबंधित प्रचलित समजुतीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी देवी-देवतांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. हिंदू कॅलेंडरनुसार, रंगपंचमी हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी रंगपंचमी 19 मार्च 2025 रोजी साजरी केली जात आहे. रंगपंचमीच्या या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सॲप संदेश, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्जद्वारे विशेष शुभेच्छा देखील देऊ शकता.
रंग नाविन्याचा
रंग चैतन्याचा
रंग यशाचा
रंग समृद्धीचा
रंगपंचमीच्या रंगात रंगून जावो
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा,
रंग आपुलकीचा, रंग बंधांचा,
रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
तुमच्या आमच्या प्रेमाच्या नात्याचा
तुमच्या गोड परिवारास रंगपंचमीच्या शुभेच्छा!
रंगात रंगून जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगानी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगात भिजुनी चिंब होता, रंगाचेही गाणे होते
सच्चेपणा रंगाचा पाहता, उत्साहाला उधाण येते
भेदभाव विसरून येथे, एकतेचे दर्शन घडते
उत्सवप्रिय देशात माझ्या, रंगातूनही हास्य उमलते
रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा!
रंग उधळूदे प्रेमाचे, त्यामध्ये सुखाचा वर्षाव असुदे
रंगाच्या या सणात, तुमचे आमचे नाते कधीही न तुटणाऱ्या धाग्यात रंगूदे
रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा!
रंगात रंगले जीवन, हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांनी रंगली अशी एक शिंपण
हृदयी उरले प्रेम अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु रंगपंचमी.. ही मनी आशा..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या शुभेच्छा!
रंगपंचमीचे रंग जणू एकमेकांच्या रंगात रंगतात,
असूनही वेगळे रंग, रंग स्वतरुच्या विसरुनी,
एकीचे महत्व सांगतात..
रंगपंचमीच्या शुभेच्छा!
हेही वाचा>>
Lucky Zodiac Sign: 19 मार्च तारीख भाग्याची! 'या' 5 राशींचं होणार चांगभलं, सोन्याचे दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)