Ram Navami 2024 : संपूर्ण भारतात आज रामनवमी (Ram Navami 2024) साजरी केली जाणार आहे. अयोध्यानगरीही (Ayodhya) देखील सजली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढल्या जाणार आहे. विशेष म्हणजे, अयोध्येत श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर यावर्षीची पहिलीच रामनवमी असणार आहे. त्यामुळे ती विशेष खास असणार आहे. यासाठी भक्तांनी भगवान श्री रामाच्या (Lord Ram) मंदिरात मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. अयोध्येतील राम मंदिरात यंदाही रामलल्लाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार त्रेतायुगानंतर या वर्षी पुन्हा एकदा प्रभू श्री रामाच्या जन्मदिवसाला दुर्मिळ योगायोग घडत आहे. या निमित्ताने काही राशींना या दुर्मिळ संयोगाचा खूप फायदा होणार आहे.
रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडतोय
राम नवमीच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल. दुसरीकडे, सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीत असेल आणि दहाव्या भावातही राहील. या दिवशी गजकेसरी योगही तयार होत आहे. असा योगायोग त्रेतायुगात श्रीरामाच्या जन्माच्या दिवशीच घडला.
मेष रास (Aries Horoscope)
देवगुरु बृहस्पती स्वतः सूर्य देवासोबत मेष राशीत आहेत. या राशीच्या लोकांना याचा फायदा होईल. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि इतर समस्या दूर होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
या राशीच्या लोकांना भौतिक सुखसोयी मिळतील. जर तुम्ही एखाद्या योजनेचं नियोजन करत आहात तर तुमची ही योजना यशस्वी होईल. तसेच, जर तुमचं एखादं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर तेही पूर्ण होईल. तसेच, जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते काम पूर्ण होईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन रास (Pisces Horoscope)
या राशीचे लोक ज्या कामात गुंतलेले असतील त्यात तुम्हाला यश मिळेल. यामुळे तुमचे मन आज खूप प्रसन्न असेल. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. जे लोक अनक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :