Raksha Bandhan Wishes In Marathi : बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिच्या रक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनाच्या या खास दिवशी तुम्ही तुमच्या बहीण-भावांना हे खास मराठमोळे शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan Wishes In Marathi) पाठवू शकता आणि या दिवसाची गोडी आणखी वाढवू शकता.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan Wishes In Marathi)

बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी,बांधिते भाऊराया आज तुझ्या हातीराखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कुठल्याच नात्यात नसेलएवढी ओढ आहे,म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,खूप खूप गोड आहे…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणाच्या सरी अखंड बरसू देभाऊ माझा यशाने न्हाऊ दे..राखी शिवाय काही नाही माझ्याकडेम्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हे बंध स्नेहाचे,हे बंध रक्षणाचे,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनबहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सणरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक धागा, एक विश्वास,हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खासरक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

भाऊ आणि बहिणीच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्यारक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

राखी हा धागा नाही नुसता,हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..आयुष्यात कुठल्याही क्षणी,कुठल्याही वळणावर,कुठल्याही संकटात,हक्कानं तुलाच हाक मारणार,विश्वास आहे माझा तुझ्यावरचारक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनघेऊन आला हा श्रावणरक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा

बहीण म्हणजे दुसरी आईजगावेगळी माझी ताईती माझी सावलीआणि माझ्या आयुष्यातली खरी माऊलीरक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

बहिणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं,निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं…सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल,नातं असं हे आपुलकीचं...भाऊ बहिणीच्या प्रेमाचं…रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

नातं बहीण-भावाचं म्हणजे टॉम अँड जेरीजेवढा राग, तेवढंच प्रेम हे म्हणजे लय भारीरक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

भाऊ लहान असो वा मोठा,बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थाननेहमीच अढळ आणि मोठंच असतंरक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,मी कधीच कशाला घाबरत नाही कारणमाझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे!रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

 मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे,कारण तो तुमच्यावर वडिलकीच्या नात्याने धाक तर दाखवतोच,पण वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षणही करतो!रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

माझा मोठा दादा म्हणजेआईशीपण बोलता येणार नाहीतअशा गोष्टी शेअर करता येणाराएक जवळचा साथीदारतुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

मला सुपरहिरोची काहीच गरज नाहीकारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहेरक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

जितका दूर असतोस तितकीचजास्त काळजी घेतोसतुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

हेही वाचा:

Raksha Bandhan 2024 : यंदाचं रक्षाबंधन 4 राशींसाठी ठरणार खास! 19 ऑगस्टपासून उजळणार नशीब; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले