Astrology Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनानंतर (Raksha Bandhan 2024) बुध ग्रह आपली रास बदलणार आहे. बुध पुन्हा एकदा सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. 22 ऑगस्टला सकाळी 6:22 वाजता बुध ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल. 4 सप्टेंबर सकाळी 11:52 पर्यंत तो कर्क राशीत राहील. या दरम्यानच्या काळात 4 राशींचं नशीब पालटू शकतं. बुधाच्या संक्रमणामुळे 22 ऑगस्टपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊ


रक्षाबंधनानंतर या राशींना सोन्याचे दिवस


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी 22 ऑगस्टला होत असलेलं बुधाचं संक्रमण लाभदायी ठरेल. बुधाच्या शुभ प्रभावाने तुमचं घर आणि वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल दिसत आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात, ज्या तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या सिद्ध होतील. या काळात तुम्हाला एक नवीन जोडीदार देखील मिळू शकेल. या काळात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते.


मिथुन रास (Gemini)


बुध संक्रमणाचा शुभ प्रभाव मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यानचा काळ तुमचा आनंद आणि सुखसोई वाढवेल. या काळात तुम्ही नवीन कपडे, दागिने इत्यादींवर पैसे खर्च कराल. जे अद्याप अविवाहित आहेत, त्यांना योग्य जोडीदार मिळू शकतो किंवा त्यांचा विवाह निश्चित होऊ शकतो.


कन्या रास (Virgo)


बुधाच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमची बचतही पूर्वीपेक्षा जास्त होऊ शकते. दरम्यान, तुम्हाला कोणतंही काम करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. या काळात तुम्हाला सरकारकडून मदत मिळेल, तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमचं सोशल नेटवर्क मजबूत होईल. शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोकांसाठी वेळ अनुकूल असेल, तुम्हाला यश मिळेल, प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील.


तूळ रास (Libra)


बुधाचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तुम्ही स्वतःसाठी नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. या काळात तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्टपासून तुमच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होऊ शकते आणि तुमच्या पदासह पगारात वाढ होण्याची पूर्ण आशा आहे. चांगल्या कामाच्या जोरावर तुम्ही मोठं यश मिळवू शकता. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Raksha Bandhan 2024 Horoscope : रक्षाबंधनाचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; धनसंपत्तीत होणार वाढ, नवीन नोकरी-व्यवसायासह बँक बॅलन्सही वाढणार