Rahu Transit 2022 : मीन राशीच्या लोकांसाठी राहूचा राशी बदल फायदेशील ठरणार आहे. परंतु, या काळात मीन राशीच्या लोकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. राहुच्या राशीबदलामुळे मीन राशीच्या लोकांना शिक्षण, नोकरी, करिअर आणि बिझनेसमध्ये कोणते फायदे होणार हे जाणून घेऊया.
येत्या काळात मीन राशीच्या लोकांनी सोशल नेटवर्क सक्रिय ठेवावे लागेल. परंतु, राहूच्या काही नकारात्मक पैलूंवर देखील बारीक लक्ष ठेवावे लागेल. मित्रांची संख्या वाढेल, पण चांगल्या संगतीलाच प्राधान्य द्यायला हवे. इंटरनेट वापराची सवय होऊ नये म्हणून सतर्क राहावे लागेल. यावेळी मीन राशीच्या लोकांना चांगले ऐकण्याची सवय लावून घ्यावी लागेल. इतरांच्या वाईट किंवा नकारात्मक वृत्तीकडे कमी लक्ष द्या.
राहूच्या राशी बदलामुळे तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. परंतु, धाडसी आणि मेहनती बनाल. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. यावेळी, तुम्हाला कार्यक्षेत्राशी संबंधित अनेक प्रवासांना जाण्याची संधी मिळेल. तुम्ही या सहलींचा चांगला फायदा देखील घेऊ शकाल. हे प्रवास तुमच्या भविष्यातही अत्यंत फायदेशीर ठरतील.
शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनत घेणाऱ्यांना चांगले यश मिळेल. ज्यांना मोठी आरोग्य समस्या आहे, अशांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
मीन राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत यश मिळू शकते. तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश तुम्हाला आनंदित करेल. जीवनातील निराशा दूर होऊन मन प्रसन्न राहील.
मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणीही इतरांच्या मदतीने उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमामुळे तुमची प्रगती होईल. आरोग्य क्षेत्र आणि सरकारी विभागांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला लाभ देणारा आहे. कार्यालयात कोणत्याही प्रकल्पात काम सुरू असेल तर त्याची गोपनीयता ठेवा. या प्रकल्पातून भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.
उपाय : दर मंगळवारी हनुमानजींच्या प्रतिमेसमोर देशी तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसा म्हणा. या उपायाने राहूच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
महत्वाच्या बातम्या