Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात (Astrology) राहूला अशुभ ग्रह मानलं जातं. साधारणपणे कुंडलीत राहूचं नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. राहु व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करतो. परंतु राहू (Rahu) हा असा ग्रह आहे की जेव्हा तो उलट्या दिशेने चाल चालतो, तेव्हा तो अनेक शुभ लाभ देतो.


ऑक्टोबर 2023 मध्ये राहू अंश बल शून्य अंश होता, त्यामुळे त्यांना फारसं फळ मिळू शकलं नाही. मात्र आता राहूने 27 अंशांची सीमारेषा ओलांडल्याने राहूला बळ मिळत आहे, त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना राहूच्या शुभ परिणामांचा फायदा होणार आहे. राहूची चाल बदलल्याने कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


राहू या राशीच्या दहाव्या घरात आहे. राहूचं हे संक्रमण अत्यंत शुभ मानलं जातं. या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते. राहूच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं, यासोबतच व्यवसायात भरघोस नफा मिळण्यासोबतच भरघोस यश मिळेल. भागीदारीत असलेल्या व्यवसायिकांना प्रचंड आर्थिक लाभ मिळेल. तुमचे एखाद्याकडे रखडलेले पैसे आता तुम्हाला परत मिळू शकतात. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय उघडू शकतात, ज्यात तुमची चांगली प्रगती होईल. लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जीवनात सकारात्मकता येईल. तुमची कामाप्रती ओढ वाढेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल.


तूळ रास (Libra)


राहू तूळ राशीच्या सातव्या भावात स्थित आहे, यामुळे तुमचं वैवाहिक जीवन खूप चांगलं जाणार आहे. रखडलेली कामं पुन्हा सुरळीत होतील. भागीदारीत उघडलेला व्यवसाय यशस्वी होईल. यासोबतच तुमचे हरवलेले किंवा अडकलेले पैसे मिळतील. त्यामुळे आर्थिक स्थितीत वाढ होईल. व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना खूप फायदा होणार आहे. तुम्हाला तुमचे मित्र आणि जवळच्या लोकांचं सहकार्य मिळेल. याशिवाय नोकरीत बढतीसह वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. राहूमुळे जे लाभ पूर्वी मिळत नव्हते ते आता मिळू लागतील.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांना राहू शुभ परिणाम देणार आहे. 18 मे 2025 पर्यंत राहु तुमचं आयुष्य आनंदाने भरवेल. या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आयुष्यात दीर्घकाळ चाललेल्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील. जीवनात स्थिरता येईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला आता बऱ्याच दिवसांपासून चालत आलेल्या तोट्यापासून आराम मिळेल आणि तुम्हाला मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल. नोकरदारांनाही विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani : शनि 17 मार्चपर्यंत राहणार अस्त स्थितीत; दरम्यान 'या' 3 राशींना बसणार फटका, प्रत्येक कामात येणार अडथळा