Rahu Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रात राहूला (Rahu) पापांचा ग्रह मानण्यात आलं आहे. राहू शुभ कार्यात विघ्न आणि बाधा आणणारा ग्रह आहे. याच कारणामुळे राहू काळात कोणत्या शुभ कार्याची सुरुवात केली जात नाही. राहूचं संक्रमण फार महत्त्वाचं आहे. जुलै महिन्यात राहू शनीच्या नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. याचा शुभ परिणाम काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर होणार आहे.
या राशींच्या जीवनावर सुखाचं आगमन होणार आहे. या राशीच्या लोकांची धन-संपत्तीसह नोकरी, व्यापारात चांगली वाढ होणार आहे. यासाठी राहूचं नक्षत्र परिवर्तन 2024 मध्ये नेमकं कधी होणार आहे? आणि याचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
शनीच्या नक्षत्रात राहूचं संक्रमण
एकूण 27 नक्षत्रात उत्तरा भाद्रपद 26 मूळ नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी शनी आणि राशी मीन आहे. मीन राशीचा स्वामी गुरु बृहस्पती आहे त्यामुळे या नक्षत्रावर शनी आणि बृहस्पतीची विशेष कृपा असणार आहे.
राहू नक्षत्र संक्रमण 2024 तारीख
8 जुलै 2024 रोजी सकाळी 04 वाजून 11 मिनिटांनी राहू उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहूचं नक्षत्र परिवर्तन वृषभ, मकर आणि कर्क राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशींच्या लोकांना बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे.
राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने या राशींना मिळणार लाभ
मकर रास (Capricorn Horoscope)
राहूचं शनीच्या नक्षत्रात संक्रमण केल्याने मकर राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक मानले जाणार आहे. या राशीच्या लोकांना धनालाभाचे योग जुळून आले आहेत. जर तुमची वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीची योजना असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल. अनेक काळापासून ज्या चिंता सतावत होत्या त्या दूर होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
राहू नक्षत्र परिवर्तन केल्यानंतर कर्क राशीच्या आठव्या चरणात विराजमान असणार आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तरूण वर्गाला चांगली नोकरी मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
राहू ग्रह वृषभ राशीच्या अकराव्या चरणात प्रवेश करणार आहे. नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. कुटुंबीयांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. संपत्तीत वाढ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :