Shani Dev : शनी (Lord Shani) सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीच्या (Shani Dev) वक्री चालीने व्यक्तीच्या जीवनावर शुभन आणि अशुभ परिणाम होतो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या राशी परिवर्तनाने  काही राशींवर साडेसाती सुरु होते तर काही राशींची साडेसाती संपते. 


ज्योतिष शास्त्रात, शनीला न्यायदेवता म्हटलं आहे. शनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. शनीला सर्व राशींवर एक संक्रमण पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनी 2023 पासून आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. आता शनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. 


2025 मध्ये कोणत्या राशींवर सुरु होणार शनीची साडेसाती?


न्याय आणि कर्मफळदाता शनी 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे मेष राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु होणार आहे. तर, मीन राशीवर दुसरा आणि कुंभ राशीवर शेवटचा चरण सुरु असेल. 


2025 मध्ये 'या' राशींवर होणार साडेसातीपासून सुटका 


आगामी 29 मार्च 2025 रोजी शनी जसे संक्रमण करेल तेव्हा मकर राशींच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होईल. तर, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांची शनीची ढैय्यापासून मुक्ती मिळेल. 


पुढच्या 10 वर्षांपर्यंत 'या' राशींवर असणार शनीची साडेसाती


सध्या शनी आपली मूळ रास कुंभमध्ये आहे. जेव्हा पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 रोजी शनी मीन राशीत संक्रमण करेल तेव्हा 3 जून 2027 पर्यंत कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. शनीचे मीन राशीत संक्रमण केल्याने मेष राशीवर शनीची साडेसाती सुरु होईल ती 2032 पर्यंत असणार आहे. तर वृषभ राशीवर 2027 पर्यंत शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु असेल. मिथुन राशीवर 8 ऑगस्ट 2029 पासून शनीची साडेसाती सुरु होईल ती 2036 पर्यंत असणार आहे. कर्क राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव 2032 ते 2038 पर्यंत असणार आहे. 


अशातच पुढच्या काही वर्षांत शनीची दृष्टी कुंभ, मीन, मिथुन, मेष आणि कर्क राशीवर असणार आहे. 


मेष ते मीन राशींपर्यंत कोणत्या राशींवर कधी असणार साडेसाती?


मेष - 29 मार्च 2025 ते 31 मे 2032 पर्यंत 


वृषभ - 3 जून 2027 ते 13 जुलै 2034 पर्यंत 


मिथुन - 8 ऑगस्ट 2029 ते 27 ऑगस्ट 2036 पर्यंत 


कर्क - 31 मे 2032 ते 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत 


सिंह - 13 जुलै 2032 ते 29 जानेवारी 2041 पर्यंत 


कन्या - 27 ऑगस्ट 2036 ते 12 डिसेंबर 2043 पर्यंत 


तूळ - 22 ऑक्टोबर 2038 ते 8 डिसेंबर 2046 पर्यंत 


वृश्चिक - 28 जानेवारी 2041 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत 


धनु - 12 डिसेंबर 2043 ते 3 डिसेंबर 2049 पर्यंत


मकर - साडेसाती सुरु आणि 29 मार्च 2025 ला समाप्त 


कुंभ - 24 जानेवारी 2022 ते 3 जून 2027 पर्यंत 


मीन - साडेसातीचं दुसरं चरण सुरु 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ashadh Mass 2024 : आजपासून आषाढ मासारंभाला सुरुवात; प्रदोष व्रत, गुरुपौर्णिमेसह जाणून घ्या महत्त्वाच्या दिवसांची यादी