Swami Samartha Baby Names : आज स्वामी समर्थांची 146 वी पुण्यतिथी. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे‘ अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थांचा आज पुण्यतिथी सोहळा. स्वामी हे सत्याच्या मार्गावर चालणारे निडर, खरे आणि शूर आहेत, आपल्या मुलांनी देखील हे गुण आत्मसात करावे, हे असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. यासाठी तुम्ही तुमच्या मुलांची नावं स्वामींच्या नावावरुन (Swami Samartha Baby Names) ठेवू शकता. अशीच काही नावं पाहूया.


स्वामींच्या नावावरुन मुलांची नावं (Swami Samartha Baby Boy Names)



  • समर्थ

  • सार्थक

  • स्वामी

  • समर्थ्य

  • साईसार्थक

  • संकल्प

  • समन्वय

  • सौमित्र

  • सुव्रत

  • सारांश

  • साजीवन

  • समर्पण

  • संवेद

  • समृद्ध

  • सामर्थिक


स्वामींच्या नावावरुन मुलींची नावं (Swami Samartha Baby Girl Names)



  • स्वामिनी

  • श्रीजा

  • स्वरुचि

  • स्वरूपा

  • स्वलेखा

  • श्रीदेवी

  • स्वामिनिका

  • स्वर्णाली

  • श्रीहर्षा

  • स्वलीला

  • समीक्षा

  • श्रीना


श्री स्वामी समर्थांचे दहा विचार (Shri Swami Samartha Thoughts)


अरे बाळा, 
उदास असशील तर माझे नाव घे, 
दु:खी असशील तर माझे ध्यान घे, 
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे,
एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ... अक्कलकोटची वाट घे


वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.


तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नेस, तर डोळे बंद करुन माझे ध्यान कर, अशाने तु माझ्याशी संवाद साधशील


 बाळा, मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो... फक्त एकदा हाक मार


लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही,कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही


कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल, तर म सांग
माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे, 
त्यापर्यंत नक्की पोहचेल


विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असशील तर, 
मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण


जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल


तुला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दु:ख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून 


अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल


हेही वाचा:


Swami Samartha Prakat Din : नेहमी चांगल्या माणसांसोबतच वाईट का घडतं? स्वामी समर्थांनी दिलं 'हे' उत्तर