Chandra Grahan 2025 : वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2025) लागणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 30 मिनिटांचा असेल. हे चंद्रग्रहण 7 तारखेच्या रात्री 9:57 वाजता होईल. पूर्ण चंद्रग्रहण रात्री 11:01 ते 12:23 पर्यंत सुरू होईल. त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. पण, ज्या राशींवर सध्या शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरु आहे. अशा लोकांवर चंद्रग्रहणाचा प्रभाव पडणार आहे की नाही ते जाणून घेऊयात.
वैदिक शास्त्रानुसार, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शनिदेवाच्या कुंभ राशीत लागणार आहे. त्यामुळे या काळात चंद्रग्रहणाचा प्रभाव साडेसाती आणि ढैय्यावर पडणार आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. तर, सिंह आणि धनु राशींच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे.
साडेसाती आणि ढैय्या राशींवर चंद्रग्रहणाचा परिणाम होणार?
चंद्रग्रहणाचा साडेसाती आणि ढैय्या राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. चंद्रग्रहणाच्या काळात तुमच्यावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या हातातून पैसा निसटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात पैशांचा जपून वापर करा.
तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने कान, नाक तसेच, गळ्याच्या संबंधित तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सावधानता बाळगा.
चंद्रग्रहणाचा सुतक काळ कधी सुरू होईल?
वैदिक पंचांगानुसार, 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल, त्यामुळे त्यानुसार ते 9 तास आधी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता सुरू होईल. त्यानंतर सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होतील. तसेच, या काळात सुतक काळ सुरू होतो, तेव्हा अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने किंवा दुर्वा घाला. जर हे चंद्रग्रहण भारतात दिसले असते, तर भारतातही सुतक काळ वैध असता.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)