Pitru Paksha 2022 : पितृपक्षाचा महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात (Hindu Religion) पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीवरील येतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
जाणून घ्या पितृपक्षाबाबत
यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर, रविवारी, 25 सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी आहे, जो हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. कृष्ण पक्षातील अमावास्येला त्याची समाप्ती होते. या कालावधीला पितृपक्ष पंधरवडा तसेच श्राद्धपक्ष म्हणतात. या दरम्यान पिंड दान आणि तर्पण हे तारखेनुसार केले जातात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवसांत श्राद्ध आणि तर्पण केले जाते. असे मानले जाते की, पितृपक्षातील श्राद्ध विधीने पितरांना मोक्ष मिळतो.
पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम
शास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्धासाठी तयार करण्यात आलेल्या पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम आहे. यासाठी सर्व प्रथम ब्राह्मणांसाठी शिजवलेले अन्न पाच भागांमध्ये काढून सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपत, प्रत्येक भागावर अखंड ठेवून पंचबली अर्पण केली जाते.
पिंडदान आणि तर्पण पद्धत काय आहे?
पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते.
पिंडदान आणि तर्पण श्राद्ध पक्षाच्या दिवसात कोणत्याही दिवशी करता येते.
श्राद्ध कालावधी या वर्षी 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे परिधान करतात.
एक लाकडी टेबल पांढऱ्या कापडाने झाकून दक्षिणेकडे तोंड करून ठेवलेले असते.
ज्यावर पूर्वजांचे छायाचित्र ठेवलेले असते.
या विधीत काळे तीळ आणि जवसच्या बियांचा उपयोग केला जातो.
पिंड पूर्वजांना तांदूळ किंवा गव्हाच्या गोळ्यांच्या रूपात अर्पण केले जातात.
पिंड हे मध, तांदूळ, गहू, बकरीचे दूध, साखर आणि तूप यापासून बनवले जाते.
यानंतर जल, मैदा, जवस, कुश आणि काळे तीळ मिश्रित तर्पण अर्पण केले जाते.
श्राद्ध आणि तर्पण विधी झाल्यानंतर गरीबांना अन्नदान केले जाते.
संबंधित बातम्या