Pigeons at Home:  विविध पक्षी त्यांचे घरटे हे झाडांवर बांधतात. सध्या झाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे काही पक्षी हे घरामध्ये घरटे बांधतात. शास्त्रात पक्ष्यांचे घरात घरटे बनवण्याबाबत उल्लेख आहे. कबुतरांनी घरात घरटे बनवणे किंवा घरात सतत कबुतर येणे हे शुभ आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. याबाबत जाणून घेऊयात...


घरात कबुतराचे आगमन होणे किंवा कबुतर घरात घरटे करणे या गोष्टी शुभ आहेत. घरात कबुतराचे आगमन झाल्यानं  तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ लागते. घरात कबुतराचे आगमन होणं हे सुख आणि शांतीचे आगमन होण्यासारखे आहे. कबुतर घरात आल्यानं कमी वेळात मोठे यश मिळते.


पक्षाला द्या खाद्य देणं ठरेल शुभ


कोणत्याही पक्ष्याला खाद्य दिल्यानं ग्रह दोष दूर होतात. पण कबुतरांसाठी घराच्या छतावर धान्य न टाकता अंगणात धान्य टाकावे.  जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर  कबुतराला जरूर खाद्य द्यावे. कबुतरांना खायला दिल्याने पैशाच्या समस्या दूर होतात. असे केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते.



शास्त्रात सांगितले आहे की, पक्ष्याला धान्य आणि पाणी दिल्याने पुण्य मिळते. असं मानलं जातं की घरात चिमणीने घरटं बनवलं तर वास्तुदोषाच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात राहणाऱ्या लोकांच्या आयुपष्यात चांगल्या गोष्टी घडतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)


हेही वाचा :