Selfish Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात  एकूण 12 राशी असल्याचे सांगण्यात आले आहे. पृथ्वीवर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती या 12 राशींपैकी एक आहे. या व्यक्तींच्या स्वभावातही फरक असतो. त्यांच्या आवडी-निवडीही वेगळ्या असतात. ज्योतिषशास्त्रात 3 राशींचे वर्णन अतिशय स्वार्थी मानले गेले आहे. असं असलं तरी हे स्वार्थी लोक दुसऱ्यांच्या प्रगतीचे कौतुक करतात. हे लोक खोटी प्रशंसा करण्यात पटाईत असतात. होय, स्वार्थपूर्तीसाठी हे लोक प्रत्येक परिस्तिथीचा सामना करायला तयार असतात. हे लोक नेहमी त्यांच्या फायद्यांचा विचार करतात. आपल्या स्वार्थासाठी मित्रांना फसवण्यातही हे लोक मागे सरत नाहीत. तथापि, त्यांच्या या स्वभावामुळे ते जीवनात प्रगती करतात. चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या आहेत या राशी?


मिथुन


या राशीचे लोक मनी माईंडेड असतात. हे लोक अतिशय चंचल आणि संभाषणात कुशल असतात. या राशीचे लोक स्वतःचा फायदा पाहून लगेच शब्द बदलतात. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आपल्या स्वार्थासाठी स्वतःच्या मित्रांना ही फसवायला हे तयार असतात. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, जो त्यांना हे गुण देतो.


सिंह 


सिंह राशीच्या लोकांना नेहमीच आपला आदर-सन्मान व्हावा असे वाटते. हे लोक स्वभावाने खूप स्वार्थी असतात. इतरांची प्रगती पाहून ते त्यांचा आदर सन्मान करतात. आपले काम करून घेण्यासाठी हे लोक कधीही कोणाचीही फसवणूक करू शकतात. हे लोक नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करतात. या राशीचा स्वामी सूर्य आहे. त्यांच्याकडून हे गुण यांना मिळाले आहेत.


कन्या


हे लोकही खूप स्वार्थी असतात. एखाद्या व्यक्तीकडून त्यांचा स्वार्थ हेतू पूर्ण होताच हे लोक लगेच त्यांची बाजू सोडून जातात. हे लोक संकटात कोणालाही साथ देत नाही. कन्या राशीचे लोक स्वतःच्या हितासाठी कोणाचाही विचार करत नाहीत. गरिबांना मदत करण्यात हे लोक पुढे असतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)