Papmochini Ekadashi 2025: माणसाचा जन्म असेल तर त्याला सुख-दु:खाच्या चक्रातून जावेच लागते. जो सुखात जराही गर्व बाळगत नाही. तसेच दु:खात जराही डगमगत नाही, तोच या जीवनरुपी चक्रात सावरतो. या जीवनात मानवाकडून कळत नकळत पाप घडत असते. ज्यामुळे विविध समस्यांचा सामना मानवाला करावा लागतो. हिंदू धर्मात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचिनी एकादशीचे व्रत केले जाते. कारण या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते. पापमोचिनी एकादशीचे उपाय अनेक समस्यांपासून मुक्ती देतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आज 25 मार्चला पापमोचिनी एकादशी आहे, त्यामुळे हे उपाय केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

पापमोचिनी एकादशीचे उपाय

आर्थिक संकटातून सुटका मिळवण्याचा उपाय : जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर एकादशीच्या संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच श्रीहरीला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. लाडूंवर तुळशीचे पान जरूर ठेवावे. पूजेनंतर सर्वांनी प्रसाद वाटून घ्यावा, जर तुम्ही उपवास केला असेल तर द्वादशीला या प्रसादाने उपवास सोडावा. या उपायाने संपत्ती वाढेल.

वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी उपाय : वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर एकादशीच्या दिवशी भांड्यात पाणी प्यावे. नंतर त्यात थोडी हळद घालून एक नाणे टाका. हे पाणी डोक्यावर 7 वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात वाहू द्या. वैवाहिक जीवनात आनंद येण्यास सुरुवात होईल.

अडकलेला पैसा मिळवण्यासाठी उपाय - उधार दिलेले पैसे परत मिळत नसतील किंवा पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते लवकर मिळवण्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी गोमती चक्राची मदत होईल. यासाठी घराच्या आजूबाजूला काही मोकळ्या जागेत एक छोटा खड्डा खणून त्यात गोमतीचक्र पुरावे. यावेळी भगवान विष्णूच्या नामाचा जप करत राहा. तसेच तुमचे अडकलेले पैसे लवकर परत मिळावेत अशी प्रार्थना करा.

नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय : जर तुम्ही वाईट विचार, घाणेरडे विचार, नकारात्मकतेने त्रस्त असाल तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला केशर मिश्रित दूध अर्पण करा. तसेच संध्याकाळी मंदिरात तुपाचा दिवा लावून श्री विष्णूची आरती करावी. फायदा होईल. हा उपाय प्रत्येक एकादशीला करता येतो.

हेही वाचा>>

Shani Transit 2025: तब्बल 6 ग्रहांचा मीन राशीत 'षडग्रही योग! 'या' 4 राशींवर धनवर्षा होणार? सर्व प्रोब्लेम संपणार..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)