Palmistry Reading : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच हस्तरेखा शास्त्राच्या माध्यमातून देखील आयुष्यातील प्रत्येक घटनांच्या बाबतीत माहिती काढता येते. आपल्या भविष्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर हस्तरेखा (Palmistry) शास्त्र यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा लोकांना आपलं अफेअर, प्रेम, लग्नाविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. अशा वेळी तुमच्या हाताच्या तळव्यावर असलेल्या छोट्या-छोट्या विवाह रेषा याविषयी फार महत्त्वाची माहिती देतात.
हस्तरेखा शास्त्रानुसार, तुमचे किती अफेअर्स होतील तसेच तुम्हाला प्रेमात यश मिळेल की धोका? त्याचबरोबर तुमची वैवाहिक स्थिती कशी असेल याचा अंदाज लावता येतो.
हाताच्या तळव्यावर कुठे असतात या रेषा?
तुमच्या हाताच्या तळव्यावर असलेल्या छोट्या करंगळीच्या खाली काही छोट्या-छोट्या आडव्या रेषा असतात. या रेषा हाताच्या बाहेरील बाजूने आत येताना दिसतात. या विवाहाच्याच रेषा असतात.
हाताच्या तळव्यांवरून जाणून घ्या तुमचं भविष्य
- प्रेम आणि लग्नाच्या बाबतीत हाताच्या तळव्याच्या वरच्या ठिकाणी अनेक रेषांच्या आधारे जाणून घेता येते. पण, जर या रेषा मोठ्या आणि स्पष्ट असतील तरतुमच्या लग्न रेषेच्या माध्यमातून खूप काही माहिती काढता येते.
- जर तुमच्या हाताच्या तळव्यावार छोट्या-छोट्या अशा भरपूर विवाह रेषा असतील तर या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता नसते. जर या रेषा स्पष्ट नसतील तर व्यक्तीचे एकपेक्षा दास्त अफेअर्स आणि ब्रेकअप होतात.
- जर तुमच्या हातावर एकपेक्षा जास्त विवाह रेषा असतील आणि त्या गडद रंगाच्या असतील तर तुमचे एकपेक्षा जास्त विवाह होण्याची शक्यता असते.
- जर तुमच्या हाताची रेषा सरळ मार्गाने जात असेल आणि त्या मार्गात कोणतेच अडथळे नसतील तर अशा लोकांच्या विवाहात कोणतेच अडथळे येत नाहीत. तसेच, त्यांचं वैवाहिक जीवन फार सुखी असतं.
- जर तुमची विवाह रेषा एखाद्या अन्य रेषेत गुंतली असेल तर तुमचा विवाह अधिक काळ टिकत नाही.
- जर तुमच्या हातावरील विवाह रेषा ठराविक अंतरापर्यंत सरळ आणि नंतर अंतर कापत असेल किंवा फार पुसट असेल तर तुमचा घटस्फोट होण्याची शक्यता असते.
- जर व्यक्तीच्या हातातून मंगळ पर्वतातून एखादी रेषा काढल्याने मस्तिष्क, भाग्य आणि हृदय रेषेला छेद देऊन बुध पर्वतावर जाऊन समाप्त होत असेल तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात ब्रेकअप किंवा घटस्फोट होण्याची शक्यता असते. किंवा त्यांच्या नात्यात अनेक अडथळे निर्माण होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :