Numerology Today 8 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. आजचा दिवस मूलांक 1 च्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. आज तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुमच्या प्रमोशनचं कारण बनू शकतात. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुमची तब्येतही थोडी बिघडू शकते, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा आजचा दिवस थोडा व्यस्त असेल. कार्यालयीन राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. सकस आहार घ्या. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्या.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांना आज दिवसभर सकारात्मक वाटेल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस खास असेल. आज तुम्हाला तुमच्या क्रशसोबत वेळ घालवता येईल. जंक फूडचं सेवन करू नका. आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस गोंधळाचा असेल. आर्थिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आज तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या सावधगिरीने हाताळावी लागेल. आज तुमच्यावर कामाचा दबाव असू शकतो. मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि मधेमधे विश्रांती घेत राहा.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांना आज थोडा तणाव जाणवू शकतो. तणावापासून दूर राहण्यासाठी आज स्वत:ला तुमच्या आवडत्या कामात व्यस्त ठेवा. प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता तुमच्यात आहे हे लक्षात ठेवा. वेळप्रसंगी तुमच्या जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चे लोक आज त्यांच्या प्रेमजीवनात बदल पाहतील. वैवाहिक जीवनात वाद टाळावे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींनी जोडीदारासोबत वेळ घालवण्याचे नवीन मार्ग शोधले पाहिजे.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती आज स्थिर राहील. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कामावर आज कामाचा ताण जास्त असेल. आज स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद असेल. 


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांनी आज स्वत:वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या, तुमच्या त्वचेची काळजी घ्या. तुम्ही काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन ठेवा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणं आज तुमच्यासाठी चांगलं राहील.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. तुम्ही आज तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवावा. आज तुम्ही डिनरची योजना आखू शकता. आज तुम्हाला एखाद्या कुटुंबातील सदस्याला आर्थिक मदत करावी लागेल. तुमचा आहार निरोगी ठेवा, जंक फूड खाऊ नका. तुमचा आजचा दिवस सकारात्मक असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Numerology 2024 : 'या' जन्मतारखेच्या लोकांचे वैवाहिक जीवन 2024 मध्ये खास, तर शिक्षण, मुलांबाबत चिंता असेल, वार्षिक अंक ज्योतिष जाणून घ्या