Numerology Of Mulank 6 : ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रात राशींनुसार स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या मूलांकावरून (Mulank) तसेच जन्मतारखेवरुन व्यक्तीचा स्वभाव आणि आवडी-निवडी ओळखल्या जातात. त्यानुसार आज आपण मूलांक (Numerology) 6 विषयी जाणून घेऊयात. खरंतर मूलांक 6 हा शनीचा शुभ क्रमांक आहे. त्यामुळे या लोकांचा स्वभाव कसा असेल ते जाणून घेऊयात. 


अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फारच रोमॅंटिक आणि इमोशनल असतात. या जन्मतारखेच्या लोकांचे आणखी काय स्वभाव वैशिष्ट्य आहेत ते जाणून घेऊयात. 


आयुष्यात अनेकदा पडतात प्रेमात                            


अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 6 असतो अशा जन्मतारखेचे लोक अनेकदा प्रेमात पडतात. तसेच, हे लोक दिसायला फारच सुंदर असतात. स्वभावाने हे लोक फार रोमॅंटिक असतात. आपल्या सौंदर्याने इतरांना आकर्षित करतात. त्याचबरोबर हे लोक पैशांचा अगदी सर्रास वापर करतात. आपलं प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात. तसेच, कोणालाही हे लोक अगदी सहजतेने प्रमोज करु शकतात इतकी हिंमत ते दाखवतात. तसेच, यांना फिरण्याची देखील खूप आवड असते. 


वर्तमानात जगतात


मूलांक 6 असणारे लोक वर्तमानात जगतात. त्याचबरोबर भविष्याचा विचार न करता विनाकारण पैसे उडवण्याची यापैकी अनेकांची सवय असते. स्वभावाने हे लोक फारच दयाळू आणि शांत असतात. तसेच, इतरांप्रती सहानुभूती यांना इतरांपेक्षा जास्त येते. 


इतर क्षेत्रात कमावतात चिक्कार पैसा 


ज्या लोकांचा मूलांक 6 आहे असे लोक जर शुक्र ग्रहाशी संबंधित असतील तर तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. या जन्मतारखेचे लोक कला, चित्रपट आणि संगीत क्षेत्रात चांगलं नाव कमावू शकतात. त्याचबरोबर यांच्या व्यवसायाबदद्ल बोलायचं झाल्यास, हे लोक सोनं, चांदी, वस्त्र, वाहन या क्षेत्रात चांगला पैसा कमावतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                               


Maharashtra CM Oath Ceremony : फडणवीसांच्या शपथविधीसाठी 'हाच' मुहूर्त का निवडला? जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार या मुहूर्ताचं महत्त्व