Maharashtra CM Oath Ceremony : आज महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारला स्पष्टच बहुमत मिळालं. मात्र, तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन पक्षातच बरीच खलबतं होत होती. अखेर आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री असतील. तसेच, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, या शपथविधीसाठी शुभ मुहूर्त नेमका कोणात असणार या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास आणि छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिष अनंत पांडव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा शुभ मुहूर्त
महायुती सरकारचा शपथविधी आज संध्याकाळी 05:30 वाजता होणार आहे. या संदर्भात नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 05 डिसेंबर रोजी 05 वाजू 57 मिनिटांनी श्रवण नक्षत्र मुहूर्त लागणार आहे. याचं वृषभ लग्न नावाचं जे स्थिर लग्न आहे आणि ध्रुव नावाचा योग या ठिकाणी निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे ध्रुवतारा अढळ आहे. त्याप्रमाणे 5 वर्ष हे सरकार अढळ राहील. कोणत्याच पद्धतीचे वादविवाद होणार नाही. क्लेषात्मक भूमिका मांडल्या जाणार नाहीत. तसेच, निर्विघ्नपणे हे सरकार चालेल. असं पाच वाजून 57 मिनिटांच्या कुंडलीचं हे वैशिष्ट्य आहे.
ज्योतिषाचार्य अनंत पांडव यांच्या मते, 5 तारखेला साधारण साडेचारनंतर स्थिर लग्न आरंभ होत आहे. त्याचप्रमाणे 5 नंतर शपथविधीला आरंभ होणार आहे. स्थिर लग्नाचा कालावधी हा काळ साडेसहा वाजेपर्यत असणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत शुब आहे. कारण स्थिर लग्नावर केलेलं कोणतंही कार्य अत्यंत स्थिर आणि चिरकाल टिकणारं ठरतं. त्यामुळे या स्थिर लग्नावरतीच हा शपथविधी निश्चित झालेला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीनुसार, वृषभ लग्न अत्यंत शुभकारक मानलं जात आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीनुसार, वृषभ आणि शुक्र हे एकमेकांच्या मैत्री भावात आहेत. त्यामुळे हा काळ दोघांसाठी चांगला असणार आहे.
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :