Numerology Of Mulank 6 : अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), मूलांक (Mulank) 6 च्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे या जन्मतारखेचे लोक फार सुंदर आणि आकर्षक असतात. त्यामुळेच लोक अगदी सहज या जन्मतारखेच्या लोकांकडे आकर्षित होतात. 

Continues below advertisement

ज्या जन्मतारखेच्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे. त्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. हा ग्रह धन-वैभव, संपत्ती, प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक ग्रह मानतात. 

शुक्र ग्रहाचा प्रभाव 

अंकशास्त्रानुसार, मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र ग्रहाच्या प्रभावाने या जन्मतारखेचे लोक प्रेमासाठी फार तरसतात. जेव्हा लोक यांच्याकडे आकर्षित होतात तेव्हा त्यांचा स्वत:वर ताबा राहात नाही. या जन्मतारखेचे लोक फार फ्लर्टी स्वभावाचे असतात. तसेच, यांना पार्टी करायला आवडते. तसेच, लग्जरी लाईफ जगायला यांना फार आवडते. या जन्मतारखेच्या लोकांना महागड्या आणि बेस्ट क्वालिटी असणाऱ्या वस्तू वापरायला फार आवडतात. 

Continues below advertisement

पार्टनरला कधीही धोका देऊ शकतात 

अंकज्योतिष शास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोक एकापेक्षा जास्त नातेसंबंध बनवतात. एवढंच काय तर, तरुणपणीच नाही तर वृद्धापकाळातही यांची लव्ह लाईफ फार चांगली राहते. याच कारणामुळे वयाच्या कोणत्याही टप्प्यात यांचं दुसऱ्या व्यक्तीवर मन येऊ शकतं. तसेच, हे लोक आपल्या पार्टनरला धोका देऊ शकतात. 

याच कारणामुळे या जन्मतारखेचे लोक एकापेक्षा अधिक लग्न करतात. वारंवार प्रेमात पडण्याच्या सवयीमुळे यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात. 

'या' क्षेत्रात भरपूर यश संपादन करतात 

शुक्र ग्रहाच्या कृपेने या राशींच्या लोकांमध्ये कधीच धनसंपत्तीची कमतरता भासत नाही. अनेकजण श्रीमंतही असतात. तसेच, मिडिया, फिल्म इंडस्ट्री, कला, फॅशनसारख्या क्षेत्रात या जन्मतारखेचे लोक यशस्वी होतात. तसेच, परफ्युम, सुगंधी वस्तू यांसारख्या वस्तूंचा ते जास्त वापर करतात. सुगंधी वस्तूंचे हे फार शौकीन असतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                            

Dhanteras 2025 : धनत्रयोदशीला जुळून आला शनि त्रयोदशीचा शुभ संयोग; 'या' 5 राशींवर आलेलं संकट टळेल, शनि करणार पापातून मुक्ती