Continues below advertisement

Archana Kavi Marriage After Divorce:मनोरंजन विश्वातून सध्या अनेकांच्या गुडन्यूज समोर येत आहेत. अनेकांचे साखरपुडे, लग्न होतायात. नुकताच रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाला. आता यातच आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चना कविने (Archana Kavi) दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. घटस्फोटानंतर बराच काळ सिंगल राहिलेल्या अर्चनाने रिक वर्गीस (Rick Varghese) याच्यासोबत सात फेरे घेतले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अर्चना कविचा दुसरा लग्नसोहळा

एंकर धन्या वर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्चना आणि रिकच्या लग्नातील काही सुंदर क्षण शेअर केले आहेत. तिने एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझ्या प्रिय मैत्रिणीचं लग्न झालं!” धन्याने शेअर केलेल्या व्हिडीओत अर्चना आणि रिक अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.

Continues below advertisement

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अर्चना कविच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सर्वजण नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. याआधी अर्चनाने 2016 साली कॉमेडियन अबीश मॅथ्यू (Abish Mathew) याच्याशी लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांतच त्यांच्या नात्यात मतभेद झाले आणि 2021 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

 

अर्चना कविचा अभिनय प्रवास

अर्चनाने 2009 साली आलेल्या ‘नीलाथमारा’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील ‘कुंजिमालू’ या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यानंतर ‘मी अँड मी’, ‘सॉल्ट अँड पेपर’, ‘हनी बी’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. यावर्षीच तिने टोविनो थॉमस अभिनीतआयडेंटिटी’ चित्रपटातून पुन्हा पडद्यावर पुनरागमन केलं. अभिनयाबरोबरच अर्चना सोशल मीडियावर सक्रिय असून, आपल्या व्लॉग्समधून ती चाहत्यांशी संवाद साधत असते.