Numerology Of Mulank 5 : अंक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचं (Mulank) एक खास वैशिष्ट्य असतं. त्यानुसार, प्रत्येक मूलांकाच्या लोकांचं एक खास व्यक्तिमत्व असतं. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या मूलांकाची माहिती मिळते. त्यानुसार, अंकशास्त्रात मूलांक 5 असणाऱ्या लोकांबद्दल फार महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कोणत्याही व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक 5 असतो. 


योग्य वेळी योग्य निर्णय घेतात


मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा स्वभाव फारच मेहनती असतो. हे लोक आपल्या बुद्धीचा वापर करुन आयुष्यात पुढे जातात. तसेच, यांची मानसिक स्थिती कधीच स्थिर नसते. हे लोक फार काळ एकाच मनस्थितीत राहू शकत नाहीत. तसेच, या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार सौम्य, बुद्धिवान, चतुर आणि हुशार असतात. तसेच, निर्णय घेण्याची यांच्यात क्षमता असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी या जन्मतारखेचे लोक ओळखले जातात. एकदा निर्णय घेतल्यानंतर हे लोक मागे हटत नाहीत. या लोकांचं व्यक्तिमत्व फार आकर्षक असतं. 


संतुष्ट जीवन जगतात


या जन्मतारखेचे लोक फार संतुष्ट जीवन जगतात. घरात असो वा बाहेर या लोकांना योग्य पद्धतीने आयुष्य जगायला आवडतं. तसेच, यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे लोक यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. आपल्या बोलण्याच्या पद्धतीने हे लोक इतरांचं सहज मनोरंजन करतात. यामुळे लोकांना यांच्याबरोबर राहायला आवडतं. स्वभावाने अत्यंत मायाळू असल्या कारणाने यांचे खूप मित्र असतात. नाती जपायला यांना आवडतं. वैवाहिक जीवन यांचं संतुष्ट असतं. 


नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये आवड 


मूलांक 5 असणाऱ्या लोकांना नोकरीपेक्षा बिझनेस करणं पसंत करतात. जरी या जन्मतारखेचे लोक नोकरी करत असतील तरी कोणी ना कोणी यांच्याबरोबर साईड बिझनेस करणारा असतो. नोकरीपेक्षा जास्त हे लोक बिझनेसमधून पैसे कमावतात. या जन्मतारखेचे लोक लेखक, मॅनेजर, डॉक्टर, पत्रकार आणि ज्योतिष असतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology Of Mulank 4 : अत्यंत संशयी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्याशा गैरसमजुतीने सहज तोडतात नातेसंबंध