Numerology Of Mulank 4 : ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. त्यानुसार, आज आपण मूलांक (Mulank) 4 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 


ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 आहे. या ठिकाणी राहू ग्रहाच्या प्रभावामुळे या जन्मतारखेचे लोक थोडेसे हट्टी, चिडखोर आणि रागीष्ट स्वभावाचे असतात. तापट स्वभाव असल्यामुळे या लोकांना कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणाने राग येतो. या मूलांकाच्या लोकांची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.  


प्लॅनिंग करण्यात तरबेज असतात


या जन्मतारखेचे लोक प्लॅनिंग करण्यात फार तरबेज असतात. कोणतंही काम करण्याआधी हे लोक नीट विचार करतात तसेच, योग्य प्लॅन आखतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक वेळेचे पक्के असतात. यांना प्रत्येक विषयाची माहिती असते. 


विचारांवर ठाम असतात


या जन्मातारखेच्या लोकांना एकदा जर निर्णय घेतला तर ते आपल्या विचारांवर ठाम असतात. तसेच, एकदा हाती घेतलेलं काम ते पूर्ण करुनच सोडतात. त्यामुळेच अनेकदा इतरांना यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित वाटतं. 


फिरण्याचे असतात शौकीन 


या जन्मतारखेच्या लोकांना स्वत:वर पैसे खर्च करायला फार आवडतात. त्याप्रमाणेच हे लोक आपल्या कपड्यांवर, शॉपिंगवर खर्च करतात. या लोकांना फिरायला देखील फार आवडतं. अनेकदा लोक यांच्या या सवयीमुळे त्रस्तदेखील होतात. मात्र, हे आपली पॅशन सोडत नाहीत. 


स्पष्टवक्तेपणा 


या जन्मतारखेच्या लोकांना कोणतीच गोष्ट मनात ठेवायला आवडत नाही. तसेच, जे मनात आहे ते ओठांवर आहे. त्यामुळे हे लोक बोलताना कधीच लाजत नाही. तसेच, आपल्याला न आवडलेली गोष्ट हे लोक तोंडावर देखील बोलून दाखवतात. थोडक्यात सांगायचं तर, यांना स्पष्टवक्तेपणा आवडतो.   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                             


Pluto Gochar 2025 : तब्बल 17 वर्षांनंतर प्लूटोचा शनीच्या राशीत होणार प्रवेश; 'या' राशी जगतील राजासारखं आयुष्य, सोन्याचे दिवस होतील सुरु