पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर, शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी काल (बुधवारी) स्वारगेट बस स्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार (Pune Crime News) होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. या ठिकाणी 20 सुरक्षारक्षक असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला. तर मोरेंच्या (Vasant More) या भुमिकेनंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी वसंत मोरे यांना फोन करुन त्यांच्यावर आणि इतर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
स्वारगेट बस जेपो परिसरातील बंद असलेल्या एसटी बसेसमध्ये गैरप्रकार होत असल्याचं वसंत मोरे यांनी काल समोर आणलं होतं. या वास्तवानंतर स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा किती रामभरोसे आहे हे चित्र स्पष्ट झालं. त्यामुळे ठाकरे गटाने तीव्र आंदोलन केले होते. या संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करून वसंत मोरे यांनी कौतुक केलं आहे. याबाबतची माहिती वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवरून दिली आहे.
काय म्हटलंय वसंत मोरे यांनी?
आपल्या पोस्टमध्ये ठाकरे गटाचे नेते सवंत मोरे लिहतात, "कोण म्हणते "मातोश्रीवर" कामाची दखल घेतली जात नाही... आंदोलनानंतर अगदी काही तासातच पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतसाहेब दोघांचीही पाठीवर थाप...आंदोलनात सहभागी सर्व शिवसैनिकांचे महिला रणरागिणींचे अभिनंदन केले", अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
उध्दव ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात काय झाला संवाद?
उद्धव ठाकरे : हॅलो, जय महाराष्ट्र वसंत राव.वसंत मोरे : जय महाराष्ट्र साहेब.उद्धव ठाकरे : चांगलं केलंत, जोरात केलंत.वसंत मोरे : हो साहेब, दोघं-तिघंच जण होतो, पण म्हटलं बाकीचे कोणी येऊन.उद्धव ठाकरे : काय.. बोलण्याच्या पलिकडे जात चाललंय सगळं.वसंत मोरे : एवढा घाणेरडा प्रकार होता तिथे एसटीमध्ये चार शिवशाहीच्या एसटी बसेस बंद पडलेल्या आहेत आणि अक्षरशः त्या एसटीमध्ये लॉजिंग केलंय हो जाणारी लोकं त्या सुरक्षा रक्षकांच्या समोरुन जातातउद्धव ठाकरे : जे काय लढतोय ना आपण सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. जीव जळतोय हे सगळं पाहून. महाराष्ट्र कुठे चाललाय, मुंबईची हालत, मराठीवर आक्रमण. तरीसुद्धा यांना पोलिसांचीही भीत नाही.वसंत मोरे : नाही ना. कुणाचीच भीती नाही या लोकांना.उद्धव ठाकरे : पण चांगलंत केलंत तुम्ही. सगळ्यांना धन्यवाद द्या आणि असेच जागते रहा.वसंत मोरे : धन्यवाद साहेब, तुमचा फोन आला खूप खूप बरं वाटलं, जय महाराष्ट्र.
संबंधित बातम्या - Swarget Bus Depo Crime: दत्तात्रय गाडे हॅबिच्युअल ऑफेंडर? स्वारगेट डेपोत पोलिसी रुबाबात तरुणींवर टाकायचा जाळं, त्या महत्त्वाच्या गोष्टीचाही तपास होणार?