Pluto Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्लूटो ग्रहाला फार खास मानलं जातं. प्लूटो (Pluto) हा ग्रह नवग्रहांमधला नाही मात्र या ग्रहाला राहू-केतू प्रमाणेच पापी ग्रह मानलं जातं. त्यामुळे याच्या स्थितीचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहायला मिळतो. प्लूटो ग्रह एका राशीत तब्बल 17 ते 18 वर्षांपर्यंत स्थित असतात. तसेच, प्लूटो ग्रहाला भ्रष्टाचार, मृत्यू, विनाश आणि पापाचा कारक ग्रह मानसा जातो. 

ज्योतिष शास्त्रानुसार, प्लूटो ग्रह शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत 1 नोव्हेंबर 2021 रोजी आला होता आणि या राशीत तो 27 मार्च 20239 पर्यंत स्थित असणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींना लाभ मिळणार आहे, तर काहींना सावधान राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

या राशीच्या नवव्या चरणात प्लूटो ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम या काळात पूर्ण होईल. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, शनीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख-शांती टिकून राहील. तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

या राशीच्या सातव्या चरणात प्लूटो ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात लवकरच एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. जर तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे. मित्रांच्या साथीने तुम्ही अनेक कामे सहज पूर्ण करु शकाल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या राशीच्या तिसऱ्या चरणात प्लूटो विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना खास लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगली प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी विकास झालेला दिसेल. या काळात तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                             

Falgun Amavasya 2025 Mantra : भगवान शंकराची कृपा राहण्यासाठी तुमच्या राशीनुसार 'या' मंत्रांचा करा जप; नशिबाचे दार उघडतील