Numerology Of Mulank 3 : वैदिक ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, ग्रहांच्या, नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीच्या भविष्याबाबत सांगितलं जातं. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार, (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असेल? याचा अंदाज लावला जातो.जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचा मूलांक (Mulank) देखील ठरवला जातो. यासाठीच आज आपण मूलांक 3 च्या लोकांबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 


अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पती आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. त्यानुसार, या जन्मतारखेच्या महिला फार हुशार, स्वावलंबी आणि कर्तबगार असतात. अत्यंत व्यवहारी स्वभाव असल्यामुळे त्यांच्या डोक्यात प्रत्येक गोष्टींचा हिशोब असतो. तसेच, या महिला कुटुंबाची देखील चांगली काळजी घेतात. मूलांक 3 च्या महिलांचा स्वभाव आणखी कसा असतो याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


उच्च शिक्षित असतात


या जन्मतारखेच्या महिलांचं अभ्यासात फार डोकं असतं. त्या अभ्यास आणि शिक्षणाच्या बाबतीत फार गंभीर असतात. तसेच, चांगली नोकरी मिळवण्यासाठी देखील या महिला कठोर परिश्रम करतात. कोणताही निर्णय या महिला विचारपूर्वक घेतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास फार मजबूत असतो. 


लग्नानंतरचं आयुष्य कसं असतं?


या जन्मतारखेच्या महिला लग्नानंतर पूर्णपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतात. घर, संसार आणि नोकरी यामध्ये समतोल राखतात. तसेच, जोडीदाराबरोबरही यांचं नातं फार घट्ट असतं. या महिला प्रत्येक नातं मनापासून निभावण्याचा प्रयत्न करतात. पण, तितकाच चुकीच्या गोष्टीला विरोध करतात. 


लग्नानंतरचं आयुष्य कसं असतं? 


या जन्मतारखेच्या महिलांना देखील इतर महिलांप्रमाणे सासरी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. त्याप्रमाणे, लग्नानंतर अनेक आव्हानांना पार करत या महिला आपल्या सासूचं तसेच, सासरच्या नातेवाईकांचं मन जिंकतात. त्यांच्या हुशारीमुळे त्या कुटुंबियांच्या पसंतीस येतात. यामुळेच मूलांक 3 असणाऱ्या सूना सासूच्या अत्यंत आवडत्या सूना ठरतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                       


Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला मीन राशीत 5 ग्रहांचा होणार 'महादुर्लभ संयोग'; 'या' राशींच्या घरात होणार धन-संपत्तीचा वर्षाव