Numerology Of Mulank 2 : ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवड-निवड कळते त्याचप्रमाणे अंकशास्त्रातील (Ank Shastra) मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावला जातो. या अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांक असतात. त्याप्रमाणे आज आपण मूलांक 2 असलेल्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असतो या संदर्भात जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2,11,20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळेच यांचं व्यक्तिमत्व चंद्रासारखं कोमल असतं. अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचे लोक फार भावूक स्वभावाचे असतात. कोणत्याही गोष्टीचं ते मनाला लावून घेतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक फार शांत स्वभावाचे असतात. यांची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.
भावानिक स्वभावामुळे वाढतात अडचणी
या जन्मतारखेला जन्मलेले लोक फार भावनिक असतात. त्यामुळेच हे लोक इतरांवर फार सहजतेने विश्वास ठेवतात. याचाच परिणाम त्यांना नंतर भोगावा लागतो.अनेकदा भावनेच्या भरात जाऊन हे लोक योग्य पार्टनर निवडण्यातही चुकतात. त्यामुळे यांना आयुष्यात प्रचंड धोके मिळतात. तसेच, भावनिक स्वभावामुळे हे लोक अति विचार देखील करतात. यामुळे यांचं प्रचंड नुकसान होतं.
'हे' आहे खास वैशिष्ट्य
या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव जरी भावनिक असला तरी हे लोक फार धैर्यवान असतात. आयुष्यात आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा ते धिटाईने सामना करतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक फार बुद्धिमानी असतात. त्यामुळे त्यांना व्यवसायात चांगलं यश मिळतं. त्याचप्रमाणे, यांना बंधनात राहायला आवडत नाही. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या भविष्यासाठी पैसा गुंतवणं देखील चांगलं जमतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: