Treanding News: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक इतक्या विचित्र गोष्टी करतात की, जेव्हा इतर लोक त्यांना अशा गोष्टी करताना पाहतात तेव्हा ते त्यांची स्तुती करण्यापेक्षा त्यांच्यावर टीका करतात. सोशल मिडियावरती नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक असं काही कृत्य करत आहेत की, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांना विचारतात की, हे करण्याची काय गरज होती? या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मर्सिडीज कारसह थेट कब्रस्तानात घुसला. त्यानंतर लोक त्याला जिवंतच कारसह खाली गाडतात. त्याला गाडीसह खाली पुरलं जात तेव्हा, तो घाबरत नाही, त्याउलट तो मौज-मस्ती करताना दिसतो.
इन्स्टाग्राम अकाउंट @chebotarev_evgeny हे एका रशियन व्यक्तीचे अकाउंट आहे, जो अतिशय धोकादायक आणि विचित्र स्टंट करणारे व्हिडिओ पोस्ट करतो. अलीकडेच, त्याने एक व्यक्तीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो त्याची मर्सिडीज कारसह एका एकब्रस्तानात घुसतो आणि नंतर इतर लोक त्याला कारसह आत दफन करतात.
कारसह व्यक्तीला पुरलं
तो व्यक्ती त्याची महागडी मर्सिडीज कार मोठ्या खोदलेल्या खड्ड्यात घालतो. तोपर्यंत तो गाडीतच बसलेला असतो. त्यानंतर वरती असलेले लोक फावडे घेऊन गाडीवर माती टाकू लागतात. एवढेच नाही तर जेसीबी मशिनच्या मदतीने माती टाकून लोक गाडी पूर्णपणे मातीखाली पुरतात. गाडीच्या आत एक व्यक्ती आहे. तो गाडीच्या आतील स्थिती दाखवतो. आतल्या माणसाला भीती वाटत नाही, उलट तो मजा करू लागतो. त्याने सोबत वाईन बाटली आणली आहे. तो कॅमेऱ्याला वाईन दाखवतो आणि हसत हसत ती पिण्याची तयारी करू लागतो.
व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर होतोय व्हायरल
या व्हिडिओला 10 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपला अभिप्राय दिला आहे. कोणीतरी इतका मूर्ख असू शकतो याची कल्पना नव्हती असे एकाने म्हटलं आहे. आणखी एकाने यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अशा प्रकारचे विध्वंसक पोस्ट करणारे अकाउंट बंद करावे. तर आणखी एका युजरने, त्या व्यक्तीला तिथे ऑक्सिजन कसा मिळत असेल! असा सवाल उपस्थित केला आहे.