Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे राशींवरुन माणसाचा स्वभाव ठरवला जातो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), व्यक्तीच्या स्वभावाची ओळख पटते. अंकशास्त्रात, प्रत्येक मूलांकाबद्दल (Mulank) काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आपण मूलांक 1 ची वैशिष्ट्य नेमकी काय ते जाणून घेणार आहोत. 


अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्याला ऊर्जेचं प्रतीक मानण्यात आलं आहे. मूलांक 1 असणारे लोक फार प्रामाणिक तसेच, बुद्धिवादी असतात. मूलांक 1 ची आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात. 


जन्मजात नेता असतात 


मूलांक 1 असणारे लोक प्रचंड आत्मविश्वासू असतात. हे लोक कोणतंही काम करताना पूर्ण आत्मविश्वासाने करतात. तसेच, इतरांना मार्गदर्शन करणं यांना फार आवडतं. इतरांना मदत करण्यासाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. त्यामुळे समाजात यांची वेगळी ओळख निर्माण होते. चारचौघांत यांना मान-सन्मान मिळतो. 


राजासारखं आयुष्य जगतात


मूलांक 1 असमाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्याचप्रमाणे या जन्मतारखेचे लोक फार सूर्याच्या प्रकाशासारखेच तेजस्वी असतात. सूर्य ग्रह असल्यामुळे आपसूकच यांच्यात राजसी गुण येतो. तसेच, या जन्मतारखेचे लोक राजकारणात फार सक्रिय असतात. यांची लाईफस्टाईल देखील इतरांपेक्षा थोडी हटके असते. 


अहंकारी स्वभाव असतो


या जन्मतारखेचे लोक फार दृढनिश्चयी असतात. त्यामुळे अनेकदा त्यांचा स्वभाव फार हट्टी आणि अहंकारी वाटतो. यामुळेच यांना इतरांचा विरोध सहन होत नाही. तसेच, यांना कधीच यांची हार सहन होत नाही. त्यामुळेच हे लोक इतरांना फार अहंकारी वाटतात. 


प्रचंड आत्मविश्वासू असतात


शक्ती, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांचा स्वामी सूर्य असल्या कारणाने हे लोक इतरांना फार हवेहवेसे वाटतात. यांचे विचार नेहमीच प्रगल्भ असतात. तसेच, आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन करतात. त्यामुळे यांचं इतरांकडून नेहमी कौतुक होत असतं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                   


Shani Vakri 2025 : लवकरच शनीची वक्री चाल; वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' 3 राशींची लागणार लॉटरी, जगतील राजासारखं आयुष्य