Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रानुसारही (Ank Shastra) प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या मूलांकानुसार (Mulank) ठरतो. याचा अर्थ प्रत्येकाचा स्वभाव तसा असेलच असे नाही मात्र, यापैकी काही स्वभाव वैशिष्ट्य गुण सारखे असतात. आज आपण अशाच मूलांक 1 च्या मुलींविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
स्वामी ग्रह सूर्य देव
अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. त्यानुसार, मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य देव आहे. यांचं व्यक्तिमत्त्व सूर्यासारखं तेजस्वी असतात. तसेच, या मुली फार स्मार्ट असतात.
कसा असतो स्वभाव?
या जन्मतारखेच्या मुली फार हुशार, चतुर आणि चाणाक्ष असतात. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा त्यांना अचूक अंदाज बांधता येतो. तसेच, या जन्मतारखेच्या मुली आपल्या पार्टनरप्रती फार कंट्रोलिंग असतात. यामध्ये काही लोकांना या जगातील सर्व गोष्टी आपल्याच म्हणण्यानुसार चालाव्यात असंही वाटतं. जर एखादी गोष्ट यांच्या मनासारखी झाली नाही तर यांचा राग आपसुकच आपल्या पार्टनरवर उतरतो.
प्रेमासाठी कोणतीही हद्द करतात पार
या जन्मतारखेच्या मुली आपल्या ध्येयाला घेऊन फार गंभीर असतात. आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्या वाट्टेल त्या हद्द पार करु शकतात. तसेच, यांना एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्या तू पूर्ण करुनच सोडतात.
पार्टनरवर गाजवतात राणीसारखा हक्क
या जन्मतारखेच्या मुली आपल्या पार्टनरच्या बाबतीत फार पझेसिव्ह असतात. तसेच, आपल्या पार्टनरवर त्या राणीप्रमाणे हक्क गाजवतात. ते म्हणतील तीच यांच्यासाठी पूर्व दिशा असते. अनेकदा पार्टनरला चीडही येऊ शकते. मात्र, या मुली तितक्याच मनाने प्रेमळ असतात. आपल्या पार्टनरप्रती त्यांना खूप प्रेम असतं.
पटकन जेलसही होतात
या जन्मतारखेच्या मुलींचा स्वभाव फार हट्टी स्वरुपाचा असतो. तसेच, आपल्या पार्टनरप्रती त्या फारच जेलस असतात. पार्टनरच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आणि प्रेमळही तितक्याच असतात. मात्र, हक्क पार्टनरपेक्षा जास्त याच गाजवतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :