Numerology Of Moolank 1 : अंकशास्त्रात (Numerology), प्रत्येक मूळ संख्येबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. प्रत्येक मूळ संख्येचं एक विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात प्रामुख्याने 1 ते 9 अंक वापरले जातात ज्यांना मूलांक (Moolank) म्हणतात. हा मूलांक जन्मतारखेनुसार ठरवला जातो. त्यानुसार काही मूलांक हे चांगले परिणाम देणारे असतात. यामध्येच काही मूलांकाच्या लोकांमध्ये जन्मत: अधिकारी होण्याचे, सरकारी नोकरी मिळविण्याचे गुण असतात. या मूलांक संख्येच्या बहुतेक लोकांना सरकारी नोकऱ्या मिळतात. ही मूलांक संख्या नेमकी कोणती ते जाणून घेऊयात. 


'या' मूलांकाच्या लोकांना मिळते सरकारी नोकरी


अंकशास्त्रात मूलांक संख्या 1 असलेल्या लोकांना खूप खास मानले जाते. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात. या मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा विशेष प्रभाव पडतो. या लोकांमध्ये अप्रतिम जन्मजात नेतृत्व क्षमता असते. 


अपार मेहनत, जिद्द आणि चिकाटी असते 


मूलांक 1 चे बहुतेक लोक हे आपल्या मेहनतीने आणि हिंमतीने सरकारी नोकरी मिळवतात. यांच्यामध्ये टीमचं नेतृत्व करण्याची क्षमता असते. हे लोक धाडसी असतात. समोर आलेलं अपयश पचवायला थोडा वेळ लागतो. पण, नंतर ते पुन्हा नॉर्मल होतात. हे लोक अतिशय शिस्तबद्ध स्वभावाचे असतात आणि याच गुणांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.


या रॅडिक्स नंबरच्या लोकांमध्ये सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता असली तरी या रॅडिक्स नंबरचे काही लोक चांगले नेतेही होऊ शकतात. याशिवाय, हे लोक इलेक्ट्रॉनिक, एंबेसी, संशोधन कार्य, वीज संबंधित व्यवसाय आणि सरकारी करार इत्यादी क्षेत्रात काम करतात. आणि आपलं वेगळं वर्चस्व सिद्ध करतात. या मूलांकाचे लोक सर्जनशीलता, कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात.


इतरांसाठी प्रेरणास्थान असतात


मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जातात. पण, त्यांच्या दृढनिश्चयाने आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करतात. या मूलांकाचे लोक इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणतात. तसेच, मूलांक क्रमांक 1 असलेले लोक कधीकधी गर्विष्ठ आणि हट्टीदेखील असतात. हे लोक काही निर्णय खूप घाईत घेतात. तसेच झटपट बदलासाठी या मूलांकाचे लोक तयार नसतात. या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : 'या' 3 राशींवर शनीची साडेसाती सुरु, तर 2 राशींवर ढैय्या; पुढच्या काळात कोणत्या राशींवर कधी असणार शनीची साडेसाती? जाणून घ्या