Numerology Of Moolank 2 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे नऊ ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचं भविष्य कळतं. त्याचप्रमाणे, अंकशास्त्राच्या (Numerology) मदतीने तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल देखील जाणून घेऊ शकता. अंकशास्त्रानुसार जन्मतारखेला जीवनात खूप महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या देखील जन्मतारखेच्या आधारे ठरवली जाते. अंकशास्त्रात प्रत्येक संख्येची स्वत:ची वेगळी खासियत असते.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 2 असते. मूलांक 2 चे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. या मूलांकाचे लोक केवळ शरीरानेच नव्हे तर मनानेही सुंदर असतात. तसेच, ते सुंदर लोकांकडे लवकर आकर्षित होतात. एकंदरीतच, मूलांक 2 चा स्वभाव कसा आहे ते जाणून घेऊयात.
या मूलांकाचे लोक बुद्धिजीवी असतात
अंकशास्त्रानुसार 2 मूलांकाचे लोक मनाने श्रीमंत असतात. हे लोक बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात. त्यांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य उत्तम असल्याचे बोलले जाते. या गुणामुळे मूलांक 2 च्या लोकांना इतरांपेक्षा जास्त मान मिळतो. प्रतिकूल परिस्थितीतही हे लोक अजिबात अस्वस्थ होत नाहीत हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
मूलांक क्रमांक 2 असलेले लोकांना संपत्तीचं जतन करायला आवडतं. ते केवळ नोकरीतच नाही तर व्यवसायातही खूप नाव कमावतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करू शकतात. मृदुभाषी असल्या कारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते. ज्या लोकांचं कार्यक्षेत्र सर्जनशीलतेशी संबंधित आहे अशा लोकांना समाजात चांगली प्रसिद्धी मिळते.
आत्मविश्वासाचा अभाव
मूलांक 2 चे लोक हे जरी बुद्धिजीवी आणि संवेदनशील असले तरी या मूलांकाच्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही. तसेच त्यांचा स्वभावही सतत बदलणारा असतो. अनेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभावही दिसून येतो.
शुभ दिवस
2, 11, 20, 29 मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी हे दिवस फार शुभ आहेत. जर तुम्हाला भविष्यात मोठं पाऊल उचलायचं असेल तर या तारखा तुमच्यासाठी विशेषतः चांगल्या मानल्या जातात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :