Numerology Of Moolank 4 : अंकशास्त्रामध्ये (Numerology) प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व मानले जाते. हे तुमच्या मूलांकानुसार (Moolank) तुमचा स्वभाव देखील सांगतात. 0 ते 9 अंकांच्या दरम्यान आहेत. अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येची स्वतःची खासियत असते.
मूलांक 4 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप खास असते. कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते. त्याचा अधिपती ग्रह राहू आहे. ही संख्या चंद्राशी देखील संबंधित आहे. जी भावनिकता, कौटुंबिक आणि आध्यात्मिक संबंधांचे प्रतीक आहे. 4 मूलांकाचे लोक कसे असतात हे जाणून घेऊयात.
प्रत्येक कामात कुशल असतात
या मूलांकाचे लोक प्रत्येक काम चांगलं करण्याचा प्रयत्न करातात. हे लोक प्रत्येक कामात निष्णात असतात. स्वभावाने हे लोक खूप धाडसी आणि व्यवहारी असतात. त्यांच्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती करतात. तसेच, हे लोक खूप वक्तशीरही असतात.
या मूलांकाच्या लोकांना जे आवडतं त्यातच ते आपलं करिअर घडवतात. यामुळेच त्यांना कामाच्या ठिकाणी खूप यश मिळते. या मूलांकाचे लोक प्रत्येक काम पूर्ण नियोजनाने करतात. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप पुढे जातात. त्यांना परदेशातून उत्तम नोकरीच्या ऑफर देखील मिळतात.
आर्थिक परिस्थिती चांगली
मूलांक 4 असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. हे लोक आपला पैसा खूप विचारपूर्वक खर्च करतात. या मूलांकाच्या लोकांना व्यवसायात भरपूर फायदा होतो. या लोकांच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते. यांच्या मेहनतीच्या जोरावर चांगले व्यापारी, वाहतूकदार, इंजिनियर, कंत्राटदार, उद्योगपती, डॉक्टर किंवा वकील बनतात.
कुटुंब आणि नातेसंबंधांना महत्त्व
मूलांक 4 चे लोक ज्याप्रमाणे धाडसी असतात तसेच खूप संवेदनशीलही असतात. हे लोक आपल्या कौटुंबिक आणि घरातील संबंधांना खूप महत्त्व देतात. यामुळेच हे लोक आपल्या भावना व्यक्त करण्यात निपुण असतात. कुटुंबियांशी यांची वेगळी अटॅचमेंट असते.
या मूलांकाचे लोक अतिशय मिलनसार स्वभावाचे असतात. हे लोक चारचौघांमध्ये सहज मिसळतात. 1, 2, 4, 7 आणि 8 अंक असलेल्या लोकांचा विपरीत लिंगाकडे जास्त कल असतो. हे लोक मनापासून मैत्री जपतात. स्वभावाने हे लोक थोडेसे स्वार्थी आणि अहंकारी असतात त्यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावं लागतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: