Numerology Mulank 9 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यामध्ये मूलांक क्रमांक 9 असलेल्या मुलींना खूप खास समजलं जातं. आज संसदेतील शपथविधीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मूलांक 9 चं महत्त्व अधोरेखित केलं आहे. 9, 18 किंवा 27 क्रमांकाचा मूलांक 9 असतो. यातील 18 क्रमांकाचं महत्त्व सांगताना मोदी काय म्हणाले? पाहूया
भारतीय संस्कृतीत 18 क्रमांकाला फार महत्त्व - पंतप्रधान मोदी
संसदेच्या शपथविधी दरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते, यावेळी त्यांना 18 क्रमांकाचं महत्त्व सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, "18व्या लोकसभेत युवा खासदारांची संख्या जास्त आहे. भारतीय संस्कृतीत 18 क्रमांकाला फार महत्त्व आहे. गीतेत देखील 18 अध्याय आहेत. आपल्याकडे पुराणांची आणि उपपुराणांची संख्या देखील 18 आहे. 18 नंबरचा मूलांक 9 आहे आणि 9 मूलांक पूर्णतेची खात्री देतो. 9 पूर्णतेचं प्रतीक आहे. वयाच्या 18 व्या वर्षी आपल्याकडे मतदानाचा अधिकार मिळतो. 18 वी लोकसभा देखील भारतासाठी शुभ संकेत आहे."
कसे असतात मूलांक 9 चे लोक?
मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे जो उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे. या मूलांकाचे लोक अतिशय उत्साही स्वभावाचे असतात. या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते, त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. हे लोक जीवनात खूप पैसे कमावतात, त्यांच्याकडे जमीन आणि संपत्तीही भरपूर प्रमाणात असते.
संपत्तीच्या बाबतीत असतात सरस
कोणत्याही महिन्याच्या 9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ते स्वत:च्या मेहनतीवर अवघं साम्राज्य उभं करतात. हे लोक बराच जमीन-जुमला आणि संपत्ती खरेदी करुन ठेवतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना आर्थिक लाभ मिळतो.
शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात
9 मूलांकाचे लोक उच्च शिक्षण घेतात, ते शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते. हे लोक शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात आणि चांगलं शिक्षण घेतात.
खूप धाडसी असतात या मुली
9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक खूप धाडसी असतात, धाडसी गोष्टी करायला त्यांना खूप आवडतं. या लोकांना कधीही कसली भीती वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :